रूममेटचा लॅपटॉप, कॅमेरा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसाच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:14 PM2018-01-25T13:14:04+5:302018-01-25T13:17:34+5:30

भांडणाचा राग मनात धरून रूममेटच्या वस्तू चोरून त्या विकण्याचा प्रयत्न करणाºया महाविद्यालयीन तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

one college student arrested by bharti university police who stole laptop, camera of roomate | रूममेटचा लॅपटॉप, कॅमेरा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसाच्या जाळ्यात

रूममेटचा लॅपटॉप, कॅमेरा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसाच्या जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देओंकार बबन ढगे (वय २०) असे आरोपीचे नावपोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, झडती घेतली असता मिळाला लॅपटॉप

पुणे : भांडणाचा राग मनात धरून रूममेटच्या वस्तू चोरून त्या विकण्याचा प्रयत्न करणाºया महाविद्यालयीन तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
ओंकार बबन ढगे (वय २०, रा़ ओम सिद्धी बिल्डिंग, चंद्रभागानगर, आंबेगाव, मूळ गाव शिरोळी, ता़ जुन्नर) असे त्याचे नाव आहे़ 
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना एक तरुण दत्तनगर येथे लॅपटॉप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी सापळा रचून तरुणाला ताब्यात घेतले़ त्याच्याकडील सॅकची झडती घेतली असता त्यात लॅपटॉप मिळाला़  मित्राशी भांडणे झाल्याने त्याचा लॅपटॉप, कॅमेरा चोरल्याचे त्याने कबूल केले.

Web Title: one college student arrested by bharti university police who stole laptop, camera of roomate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे