वीज नाही, पाणी नाही; दरवाजेही नादुरुस्त, आळंदी पालिकेच्या शाळेची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:06 AM2018-03-13T01:06:15+5:302018-03-13T01:06:15+5:30

चावडी चौकातील आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक दोन या शालेय इमारतीच्या जिन्यातील लोखंडी दरवाजा अनेक महिन्यांपासून तुटलेल्या नादुरुस्त अवस्थेत आहेत.

No electricity, no water; The doors are bad, the condition of the school of Alandi school | वीज नाही, पाणी नाही; दरवाजेही नादुरुस्त, आळंदी पालिकेच्या शाळेची अवस्था

वीज नाही, पाणी नाही; दरवाजेही नादुरुस्त, आळंदी पालिकेच्या शाळेची अवस्था

Next

आळंदी : येथील चावडी चौकातील आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक दोन या शालेय इमारतीच्या जिन्यातील लोखंडी दरवाजा अनेक महिन्यांपासून तुटलेल्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. यामुळे विद्यार्थीे, शिक्षक आणि पालक यांना जिन्यातून ये-जा करताना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. या प्रशालेचा वीजपुरवठा बिल न भरल्याने खंडित करण्यात आला आहे. यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. इतर प्रशालेत जाऊन कामकाज उरकावे लागत आहे.
शालेय परिसरातील कचराकुंड्या भरून वाहत असल्याने आता नागरिकांच्याही नाराजीत वाढ झाली आहे. शाळेच्या मागील बाजूला मोठ्या प्रमाणात कचºयाच्या साम्राज्य आहे. मुलांच्या संख्येच्या प्रमाणात या इमारतीत स्वच्छता गृहे नसल्याने शालेय मुलांसह मुलींनादेखील इतरत्र नैसर्गिक विधीस जावे लागत आहे. याठिकाणी पाण्याच्या साठवण व्यवस्थेचा अभाव असल्याने यावर मर्यादा येत आहेत.
आळंदी नगरपरिषदेने स्वत:ला हगणदारीमुक्त शहर म्हणून घोषित करून पुरस्कारदेखील मिळवला आहे. मात्र, या शाळेत स्वच्छतागृहात पुरेशा प्रमाणात पाणी, प्रभावी स्वच्छता, शाळेत पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. येथील मुले तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत विकसित केलेल्या भागीरथी नाल्यावर बांधलेले नागरिक-भाविकांसाठीच्या स्वच्छता गृहांचा वापर करीत आहेत. या ठिकाणीदेखील परिसरात अस्वच्छतेसह दुर्गंधीयुक्त परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे पालक,नागरिक व शालेय मुले यांच्यात नाराजी आहे. भागीरथी नाला मार्ग रहदारीस स्वच्छतेअभावी मर्यादित लोक वापरकरीत आहेत. या परिसरात नियमित स्वच्छता व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
या इमारतीच्या प्रवेशद्वारात जिन्याचे लोखंडी दरवाजे खराब झाल्याने शालेय शिक्षकांसह मुलांना रहदारीस अडथळा होत असल्याची बाब प्रशासनाचे निदर्शनास आणून देण्यात आली आहे.यात शिक्षण मंडळ,आळंदी नगरपरिषद व शालेय व्यवस्थापन समिती यांनी मुलांचे सुरक्षिततेची काळजी घेण्याची गरज असल्याचे पालकांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमधील विविध सेवा सुविधा व अडचणींच्याबाबतीत वेळोवेळी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी, नगरपरिषद, मुख्याधिकारी यांना लेखी निवेदने देऊन कळविले असल्याचे मुख्याध्यापिका यांनी सांगितले.
> विंधनविहीर वापरायोग्य
शाळेत पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी साठवण क्षमता साधने नसतानादेखील लगत असलेली विंधन विहीरदेखील वापरा योग्य करण्यास पाणीपुरवठा विभाग,शिक्षण मंडळ दुर्लक्ष करीत आहे.यातून नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.मागील बाजूला स्वच्छता साफसफाईचा अभाव असल्याने कचºयाचे
साम्राज्य असून, स्वच्छता करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या परिसरातील कचराकुंडी नेहमी भरून वाहताना भाविक -नागरिक
पाहून येथील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत.
आळंदी नगरपरिषदेकडून शिक्षण मंडळास वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. मात्र, शालेय कामकाज सुरळीत होण्यासाठी यापुढील काळात शाळानिहाय निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. तत्काळ निर्धारित कर संकलना नंतरचा शिक्षण निधी अथवा नगरपरिषद फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
- सागर भोसले, उपनगराध्यक्ष, आळंदी नगरपरिषद
>जिन्याचे प्रवेशद्वाराचे तुटलेले लोखंडी दरवाजे दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरूआहे. लवकरच दुरुस्ती करून रहदारीयोग्य जिना होईल.
- संघपाल गायकवाड, नगरपरिषद बांधकाम विभाग प्रमुख, आळंदी

Web Title: No electricity, no water; The doors are bad, the condition of the school of Alandi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे