अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 17:32 IST2018-10-27T17:15:55+5:302018-10-27T17:32:36+5:30

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधील अग्रलेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असून संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले.

ncp activists burned newspaper samana in pune | अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले

अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले

पुणे - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधील अग्रलेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असून संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी सामनाची होळीही पेटवण्यात आली.

शिवसेनेने राम मंदिर बांधू असे जाहीर केल्यावर अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर 'सामना'तर्फे आज प्रकाशित करणाऱ्या अग्रलेखात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात सामना कार्यालयजवळील चौकात आंदोलन केले. यावेळी सामनाची होळी करण्यात आली तर संपादक खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, सामनाने अशी भाषा वापरणे चूक आहे. त्यांचे राजीनामे खिशात ठेवून ठेवून फाटले आहेत. त्यामुळे त्यांनी अशी भाषा वापरणे हास्यास्पद आहे.

Web Title: ncp activists burned newspaper samana in pune