महापालिका उद्यान निरीक्षकाला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:09 PM2018-04-02T16:09:37+5:302018-04-02T16:11:41+5:30

सोसायटीच्या बाहेर असलेल्या झाडांची मुळे आत आल्याने झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना कल्याणीनगर येथील महापालिकेच्या उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.

municipal garden inspector caught Accepting 40-thousand rupees bribe | महापालिका उद्यान निरीक्षकाला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

महापालिका उद्यान निरीक्षकाला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Next
ठळक मुद्देघराचे नुकसान होत झाडे तोडण्यासाठी महापालिकेकडे अर्ज

पुणे : सोसायटीच्या बाहेर असलेल्या झाडांची मुळे आत आल्याने झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना कल्याणीनगर येथील महापालिकेच्या उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. राजेंद्र पोपट कळसकर (वय ३८, रा़ कदम वाक वस्ती, कवडी माळवाडी, लोणी काळभोर) असे या उद्यान निरीक्षकाचे नाव आहे़ . तक्रारदार राहत असलेल्या सोसायटीच्या बाजूला असलेल्या झाडांच्या मुळांमुळे त्यांच्या घराचे नुकसान होत होते. त्यासाठी ही झाडे तोडण्यासाठी त्यांनी महापालिकेकडे अर्ज केला होता़. त्यांच्या अर्जाची चौकशी करुन अहवाल पाठविण्याचे काम राजेंद्र कळसकर यांच्याकडे त्यानुसार त्यांनी सोसायटीला भेटही दिली होती़. आपल्या अर्जाचे काय झाले याची त्यांनी चौकशी केल्यावर झाडे तोडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी त्यांनी ६० हजार रुपयांची मागणी केली होती़. 
याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यावर २९ मार्च रोजी पडताळणी करण्यात आली़ . त्यावेळी त्यांनी ४० हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार मनपाच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील जॉगर्स पार्क येथे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्क, पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी व त्यांच्या पथकाने आज सापळा रचला़. दुपारी दीडच्या सुमारास तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना राजेंद्र कळसकर यांना पकडण्यात आले़.

Web Title: municipal garden inspector caught Accepting 40-thousand rupees bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.