महायुतीची आज पुण्यात रॅली, कर्वे रस्ता वाहतुकीस बंद; माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:33 AM2024-04-25T10:33:30+5:302024-04-25T10:33:55+5:30

कर्वेरोड, डेक्कन परिसर, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने येथे तात्पुरत्या स्वरूपात काही बदल केले आहेत, अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली....

Mahayuti's rally in Pune today, Karve road closed for traffic; Know the alternative way | महायुतीची आज पुण्यात रॅली, कर्वे रस्ता वाहतुकीस बंद; माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

महायुतीची आज पुण्यात रॅली, कर्वे रस्ता वाहतुकीस बंद; माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी साडेनऊ ते साडेबारादरम्यान रॅली काढणार आहेत. ही रॅली शिवाजी पुतळा, कर्वेनगर ते छत्रपती संभाजी पुतळा, डेक्कनदरम्यान होणार आहे. त्यामुळे कर्वेरोड, डेक्कन परिसर, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने येथे तात्पुरत्या स्वरूपात काही बदल केले आहेत, अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

असे असतील बदल...

१) कर्वे रस्ता - नळ स्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौकादरम्यान कर्वे रस्ता वाहतुकीस बंद.

- पर्यायी मार्ग : पौड, कर्वे रस्त्यावरून येणारी वाहने स्वारगेट परिसरामध्ये जाण्यासाठी नळ स्टॉप - म्हात्रे पूल - सेनादत्त चौकी चौकमार्गे जातील.

- पौड, कर्वे रस्त्यावरून येणारी वाहने डेक्कन, शिवाजीनगर परिसराकडे जाण्यासाठी पौड फाटा, आठवले चौक, लॉ कॉलेज रस्त्याने इच्छितस्थळी जातील.

२) खंडोजीबाबा चौक व टिळक चौक...

- जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौकमार्गे जाणारी वाहने कर्वे, पौड रस्त्याकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौक, सिमला ऑफिस गणेशखिंड रस्त्याने एस. बी. जंक्शनवरून एस. बी. रस्त्याने नळस्टॉप चौकमार्गे जावे.

- स्वारगेटकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रस्त्याने गाडगीळ पुतळा, जेधे चौकमार्गे जातील.

Web Title: Mahayuti's rally in Pune today, Karve road closed for traffic; Know the alternative way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.