महाराष्ट्र हेच देशाचे ‘ग्रोथ इंजिन’; देवेंद्र फडणवीस, राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 09:28 AM2024-03-10T09:28:46+5:302024-03-10T09:28:53+5:30

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आयोजित विकसित भारत संकल्पनेतील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते.

maharashtra is the growth engine of the country said devendra fadnavis | महाराष्ट्र हेच देशाचे ‘ग्रोथ इंजिन’; देवेंद्र फडणवीस, राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर 

महाराष्ट्र हेच देशाचे ‘ग्रोथ इंजिन’; देवेंद्र फडणवीस, राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर 

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : भारताला विकसित करण्याचा मार्ग महाराष्ट्रातून जात असून, महाराष्ट्र हेच देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार देखील देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रातच होत असल्याचे सांगून २०१९ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर, तर २०३५ पर्यंत ती दोन ट्रिलियन डॉलर करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. 

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आयोजित विकसित भारत संकल्पनेतील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. भांडारकर संस्थेतर्फे अभय फिरोदिया, भूषण पटवर्धन, प्रदीप रावत यांनी फडणवीसांचा सत्कार केला. ‘दहा वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था जगातील पाच नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये होती. मात्र, दहा वर्षांनंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलली असून, भारताची अर्थव्यवस्था पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाऊ लागली आहे. 

२०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न असून, हा मार्ग महाराष्ट्रातूनच जात आहे. त्यानंतर गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश या तीन राज्यांचा क्रमांक असून, या तिन्ही राज्यांची एकत्रित गुंतवणूक महाराष्ट्रापेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.’ पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मी पुण्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहे; पण पुण्यातून निवडणूक नक्कीच लढवणार नाही, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी भाषणात दिली.

 

Web Title: maharashtra is the growth engine of the country said devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.