उजाड माळरानावर फुलली शिक्षणाची बाग, महाराष्ट्र सरकारकडून विठ्ठलवाडीच्या शाळेची यशोगाथा चित्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 01:08 AM2018-08-14T01:08:14+5:302018-08-14T01:08:33+5:30

देऊळगावगाडा (ता. दौंड) केंद्रातील विठ्ठलवाडी प्राथमिक शाळेने आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून येथील उजाड माळरानावर शिक्षणाची बाग फुलविली आहे.

Maharashtra Government depicts the success story of Vitthalwadi school | उजाड माळरानावर फुलली शिक्षणाची बाग, महाराष्ट्र सरकारकडून विठ्ठलवाडीच्या शाळेची यशोगाथा चित्रित

उजाड माळरानावर फुलली शिक्षणाची बाग, महाराष्ट्र सरकारकडून विठ्ठलवाडीच्या शाळेची यशोगाथा चित्रित

googlenewsNext

खोर - देऊळगावगाडा (ता. दौंड) केंद्रातील विठ्ठलवाडी प्राथमिक शाळेने आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून येथील उजाड माळरानावर शिक्षणाची बाग फुलविली आहे. या शाळेची दखल महाराष्ट्र सरकारने घतली असून, माहिती व जनसंपर्क मंत्रालयाने शाळेची यशोगाथा याच शाळेतील उपक्रमशील शिक्षक युवराज घोगरे यांच्या आवाजात चित्रित करून ती प्रसारित केली आहे.
या शाळेने आत्तापर्यंत अनेक वेळा आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. शाळेने तयार केलेला स्वच्छ भारत अभियानाचा लोगो संसदेमधील प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोमध्ये प्रदर्शित झाला होता. शाळेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले होते. केंद्र सरकारच्या ब्लॉगवर, महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर शाळेचा लेख, व्हिडीओ, फोटो झळकले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शाळेतील युवराज घोगरे या शिक्षकाला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. २०१७-१८ या वर्षात पुणे जिल्ह्यातील विविध स्पर्धांमध्ये सर्वांत जास्त १७ बक्षिसे या शाळेला मिळाली आहेत. या शाळेचे वैविध्यपूर्ण व नावीन्यपूर्ण उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रभर पाहिले जातात.
ग्रामस्थांनी एकत्र येऊन अनेक भौतिक सुविधा शाळेत निर्माण केल्या आहेत. ही शाळा गेली अनेक वर्षे एक तास अगोदरच भरते. गावातील गावकरी नेहमी शिक्षकाच्या कार्यास आपल्या सहकार्याने प्रेरणा देतात. या गावाच्या सरपंच पूनम विधाटे, माजी सरपंच डी. डी. बारवकर, ग्रामपंचायत सदस्य केशव बारवकर, अजय गवळी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत बारवकर, मुख्याध्यापक संदीप ढगे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी तत्पर असतात. या शाळेचे सध्या नूतनीकरणाचे काम चालू असून, दौंड तालुक्यातील प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून विठ्ठलवाडी प्राथमिक शाळेकडे पाहिले जाते. येथील शाळेचा कला मंच व शाळेचे प्रवेशद्वार येणाºया-जाणाºयाचे मन अगदी प्रसन्न करीत आहे.

शाळेचा विकास हाच शिक्षकाचा ध्यास...
या शाळेतील युवराज घोगरे हे शिक्षक नेहमी शाळेच्या प्रगतीसाठी नवनवीन कल्पना साकारत असतात. ‘एकच ध्यास-शाळेचा विकास’ हे ध्येय त्यांची गावकºयांसमोर ठेवले व आकारास आणले.
सानेगुरुजी व महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून ते नेहमी आपला सर्व वेळ शाळेसाठी देतात. मुख्याध्यापक संदीप ढगे हे या शिक्षकाला नेहमी मोलाची साथ देतात.

Web Title: Maharashtra Government depicts the success story of Vitthalwadi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.