नोकरीच्या आमिषाने युवकांची फसवणूक, मोठे रॅकेट असण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:38 AM2017-11-20T00:38:13+5:302017-11-20T00:38:25+5:30

तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने जाळ्यात अडकवून बनावट नियुक्तीपत्रे देत ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला

Job bait betrayed youth, likely to be big racket | नोकरीच्या आमिषाने युवकांची फसवणूक, मोठे रॅकेट असण्याची शक्यता

नोकरीच्या आमिषाने युवकांची फसवणूक, मोठे रॅकेट असण्याची शक्यता

Next

कोरेगाव भीमा : सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात वेबसाईटवरून तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या जाहिरातीतून तीन तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने जाळ्यात अडकवून बनावट नियुक्तीपत्रे देत ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीच्या गरजेपोटी अनेकांची फसवणूक होत असल्याने औद्योगिक क्षेत्रात बनावट नोकºया देणाºयांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.
प्रवीण ज्ञानदेव बोरकर (रा. महादेवनगर, मांजरी, हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण बोरकर व त्याचे मित्र कुमार जयदीप सुरेश देवरे व अमोलमुळे हे दोन मित्र नोकरीच्या शोधात असताना त्यांना १२ सप्टेंबर २०१७ रोजी इंडीड नावाच्या वेबसाईटवर नोकरीची जाहिरात दिसली.
त्यांनतर त्यांनी त्यावरून अमितकुमार नावाच्या इसमाला संपर्क साधला. अमितकुमार याने प्रवीण व त्याच्या मित्रांना सणसवाडी येथील सिनटेक्स बीएपीएल कंपनीत कामगार भरती असल्याचे सांगत कोथरूड येथे भेटा असे सांगितले.
त्यांनतर प्रवीण व इतर दोघे अमितकुमार याला कोथरूड येथे भेटले त्यांनतर अमितकुमार याने तुम्हाला कंपनीचे आॅफर लेटर मिळेल, त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील व तुमची सर्व प्रोसेस कंपनीमध्ये होईन, असे सांगितले. त्यांनतर अमितने तुमची प्रोसेस सुरू करायची आहे त्यासाठी कागदपत्रे व प्रत्येकी ६० हजार रुपये घेऊन या, असे फोनवर सांगितले.
यावेळी अमितकुमार देखील तेथे आला त्याने वरील तिघांना मी कंपनीत आतमध्ये जाऊन येतो, तुम्ही बाहेर थांबा असे सांगितले.
त्यानंतर काही वेळाने अमित बाहेर येऊन तिघांना एचआर यांच्या केबिनमध्ये घेऊन गेला तेथे एका प्रदीप शुक्ला नावाच्या
व्यक्तीने तिघांचा मुलाखत घेतली व तुम्ही कोणाला काही बोलू नका, सरळ बाहेर जा, असे सांगितले.
त्यानंतर अमितकुमार याच्या फोनवर प्रदीप शुक्ला यांनी फोन करून तिघांशी बातचीत केली त्यांनतर तिघांना कंपनीचे नियुक्तीपत्र दिले, यांनतर अमित कुमार याचा मित्र तिघांना पुणे येथे भेटला.
त्यावेळी तिघांनी त्याला ठरलेल्या पैशातील राहिलेले पैसे दिले, वरील तिघांनी अमितकुमार याला कामाला लावण्यासाठी वेळोवेळी असे सुमारे ३ लाख ८० हजार रुपये दिले तर अमितकुमारने दिलेल्या नियुक्ती पत्रावर २४ आॅक्टोबर
तारीख होती. त्यांनतर अमितने तुम्ही कामाची नियुक्ती तारीख
पुढे ढकलली आहे, असे सांगितले.
त्यांनतर अमितचा फोनच लागला नाही म्हणून वरील तिघांनी
कंपनीत जाऊन चौकशी केली असता त्यांना दिलेले नियुक्तीपत्र
बनावट आहे. कंपनीने कोणालाही नियुक्तीपत्र दिलेले नाही.
तसेच कंपनीत कोणी अमितकुमार व प्रदीप शुक्ला नावाची व्यक्ती नसल्याचे समजले,
त्यांनतर वरील तिघांची फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. शिक्रापूर
पोलिसांनी अमितकुमार (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी
गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करत आहे.
>त्यांनतर वरील सर्वजण कागदपत्रांसह अमित याला शिवाजीनगर येथे भेटले. त्यांनतर अमित हा पैसे व कागदपत्रे घेऊन गेला त्यांनतर फिर्यादी व त्याच्या मित्रांना २८ सप्टेंबर रोजी गुजरातवरून एका नंबरहून फोन आला त्यांनी प्रवीण व त्यांच्या मित्रांची फोनवरच मुलाखत घेतली. त्यांनतर वरील तिघांना सणसवाडी येथील सीनटेक्स बिएपीएल कंपनीत बोलाविण्यात आले.

Web Title: Job bait betrayed youth, likely to be big racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.