ईशा जोशी हिला दुहेरी मुकुटाचा मान, जिल्हा मानांकन टेबल टेनिस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:43 AM2018-08-25T02:43:27+5:302018-08-25T02:43:33+5:30

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत ईशा जोशी हिने दुहेरी विजेतेपद पटकावले. शौनक शिंदे, आदर्श गोपाळ आपापल्या गटांमध्ये अजिंक्य

Isha Joshi won the title of the double crown, the district marking table tennis | ईशा जोशी हिला दुहेरी मुकुटाचा मान, जिल्हा मानांकन टेबल टेनिस

ईशा जोशी हिला दुहेरी मुकुटाचा मान, जिल्हा मानांकन टेबल टेनिस

Next

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत ईशा जोशी हिने दुहेरी विजेतेपद पटकावले. शौनक शिंदे, आदर्श गोपाळ आपापल्या गटांमध्ये अजिंक्य ठरले. पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. २१ वर्षांखालील मुलींच्या युवा गटात अतितटीच्या झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित ईशा जोशी हिने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या मानांकित पृथा वर्टीकरचा ४-३(११/८, ६/११, ९/११, ६/११, १६/१४, ११/६, ११/९)असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

चुरशीच्या सामन्यात सुरुवातीला ईशाने पहिला सेट पृथाविरुद्ध ११/८असा तर, पृथाने दुसरा सेट ईशा विरुद्ध ११/६असा जिंकून बरोबरी साधली. पृथाने जोरदार आक्रमण करत ईशाविरुद्ध पुढील दोन्ही सेट ११/९, ११/६असा जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर सामन्याच्या शेवटपर्यंत पृथाला सूर गवसला नाही व याचाच फायदा घेत ईशाने पुढील तीनही सेट १६/१४, ११/६, ११/९ असे जिंकून विजेतेपद मिळवले. महिला गटातही ईशाने बाजी मारत सातव्या मानांकीत प्रिथीका सेनगुप्ता हिचा ११-९, ११-४, ११-७, ८-११, ११-९ असा पराभव करत दिहेरी मुकुटाचा मान मिळवला. ईशा स.प महाविद्यालय येथे प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे उपेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ईशाचे युवा गटातील या वषार्तील हे तिसरे तर महिला गटातील चौथे विजेतेपद आहे.

२१ वर्षांखालील मुलांच्या युवा गटात शौनक शिंदे याने गौरव लोहपत्रेचा ४-२(११/८, ११/६, २/११, ९/११, ११/९, ११/८)असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. सामन्यात पहिल्या दोन सेटमध्ये शौनकने आपले वर्चस्व कायम राखत गौरव विरुद्ध ११/८, ११/६अशा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या गौरवने आपल्या खेळात नवीन रणनिती आखत शौनकविरुद्ध पुढील दोन सेट ११/२, ११/९अशा फरकाने जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर शौनकने जोरदार पुनरागमन करत गौरव विरुद्ध पुढील दोन सेट ११/९, ११/८ असे जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. १६वर्षीय शौनक हा पी.जोग.महाविद्यालयात वाणिज्य शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून रेडियंट स्पोर्ट्स अकादमी येथे प्रशिक्षक रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या गटातील या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. पुरूष गटात दहाव्या मानांकित आदर्श गोपाळने बिगर मानांकीत गौरव लोहपात्रेचा ४-२(११-७, १२-१४, ११-८, ५-११, ११-६, १२-१०) असा पराभव करत विजेतेपद पटकावले. १६ वर्षीय आदर्श हा लॉयला हायस्कुल मध्ये शास्त्र शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वषार्तील
या गटातील हे पहिलेच विजेतेपद आहे. स्पर्धेत एकूण ८० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. पृथा वर्टीकर हिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्या मुळ्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी क्लबचे खजिनदार आनंद परांजपे, पीडीटीटीएचे संस्थापक सुभाष लोढा, पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोणकर, महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्ष स्मिता बोडस, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस प्रकाश तुळपुळे, संयोजन सचिव अविनाश जोशी, दीपक हळदणकर, मधुकर लोणारे, उपेंद्र मुळ्ये, कपिल खरे, राहुल पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Isha Joshi won the title of the double crown, the district marking table tennis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.