हातावरील गोंदलेल्या नावावरुन महिलेच्या खुनाचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 09:07 PM2018-05-14T21:07:51+5:302018-05-14T21:07:51+5:30

लोहगाव येथील शेतात एका महिलेचा ८० टक्के जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता़. तिच्या उजव्या हातावर इंग्रजीत ए बी आणि अयोध्या असे गोंदलेले होते़. या छोट्या धाग्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने तपास सुरु केला़.

investigation completed of women murder case due to name tatto on hand | हातावरील गोंदलेल्या नावावरुन महिलेच्या खुनाचा छडा

हातावरील गोंदलेल्या नावावरुन महिलेच्या खुनाचा छडा

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी : फेसबुकवरुन पटली ओळख         महिलेकडून गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत , तू घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न कऱ नाही तर तुझ्या घरी येऊन तमाशा करेन, अशी धमकी

पुणे : लोहगाव येथील शेतात महिलेचा जवळपास ८० टक्के मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. तिच्या हातावर अयोध्या असे गोंदले असल्याचे लक्षात आले़. या एका छोट्याच्या धाग्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने फेसबुकच्या साहाय्याने या महिलेचे ओळख पटविली व खुन करणाऱ्या तिच्या प्रियकराला जेरबंद करण्यात यश मिळविले़. 
अयोध्या सुदाम वैद्य (वय २५, रा़ शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़. तिचा प्रियकर बालाजी ऊर्फ गुरुजी वैजनाथ धाकतोंडे (वय २७, रा़ गणपती मंदिराजवळ, मुंजाबा वस्ती, विश्रांतवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे़. 
याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी दिली़. लोहगाव येथील स़ ऩ १०९ पाटील वस्ती येथील शेतात ११ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास एका महिलेचा ८० टक्के जळालेल्या मृतदेह मिळाला होता़. तिच्या उजव्या हातावर इंग्रजीत ए बी आणि अयोध्या असे गोंदलेले होते़. या छोट्या धाग्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने तपास सुरु केला़. तेवढी तांत्रिक माहिती व फेसबुकच्या आधारे उजव्या हातावर गोंदलेल्या अयोध्या वैद्य या महिलेचा फोटो आढळून आला़. तिची व मृतदेहाची माहिती जुळून आल्याने ही तीच महिला असावी, अशी खात्री पटली़. तिच्या जवळच्या मैत्रिणीचा शोध घेऊन पोलिसांनी तिचा पत्ता शोधून काढला़. तिला फोन आल्याने ती १० मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता धानोरी रोड येथील बालाजी धाकतोंडे याला भेटायला गेली होती़. त्यानंतर ती परत न आल्याचे तिच्या घरमालकाने सांगितले़. धाकतोंडे १० मे पासून हेअर सलूनच्या दुकानात आला नव्हता़. त्याने त्याच रात्री आपल्या पत्नीला फोन करुन माझे हातून मोठे लफडे झाले आहे़, तू ताबडतोब सर्व सामान घेऊन गावी निघून जा, असे सांगितले़. त्याचा शोध घेतला असताना तो हडपसर येथील काळेपडळमध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली़. पोलिसांनी सोमवारी त्याला तेथून ताब्यात घेतले़. त्याने आपला साथीदार आंड्या ऊर्फ अनिकेत सुनिल खंडागळे (रा़ सिद्धार्थनगर, लोहगाव) याच्या मदतीने अयोध्या वैद्य हिचा खुून केल्याची कबुली दिली़. 
 वैद्य या एका कंपनीत कामाला असून साडेतीन वर्षांपासून पुण्यात आहेत़. यापूर्वी त्यांचे दोन लग्ने झाली असून त्यांनी दोघांनाही सोडले आहे़. हेअर सलूनमध्ये गेल्याने त्यांची बालाजी धाकतोडे याच्याशी ओळख झाली होती़. त्यांचे गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत , तू घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न कऱ नाही तर तुझ्या घरी येऊन तमाशा करेन, अशी धमकी ती वारंवार बालाजीला देत असत़. त्यामुळे तिचा काटा काढण्यासाठी त्याने अनिकेतच्या मदतीने कट रचला़. पेट्रोल विकत घेऊन तिला बोलावून घेतले़. ते तिघे जण लोहगाव येथे आडबाजूला गेले़. तेथे तिला दारू पाजली़. त्यांचे तेथे पुन्हा भांडण झाले़. तेव्हा त्याने चाकूने तिला भोसकून तिचा खुन केला़. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळून टाकला़.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त भानूप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक फौजदार लक्ष्मण शिंदे तसेच पोलीस कर्मचारी संतोष मोहिते, प्रदीप सुर्वे, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, माणिक पवार, केरबा गलांडे, सिद्धराम कोळी, महेश वाघमारे, गणेश बाजारे, प्रविण काळभोर, अमजद पठाण, अंकुश जोगदंडे, प्रमोद घाडगे, सुनंदा भालेराव स्नेहल जाधव यांनी केली आहे़. 
....
अयोध्या हिचा मृतदेह जवळपास ८० टक्के जळालेला होता़. त्यावरुन ओळख पटत नव्हती़.त्याचवेळी तिचा उजवा हात अर्धवट जळालेला होता़. पोलिसांनी तो धुतल्यावर त्यावर गोंदविलेले अयोध्या हे अक्षर दिसू लागले़. या एका धाग्यावरुन पोलीस तिच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचले़. 

Web Title: investigation completed of women murder case due to name tatto on hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.