नऱ्हे पोलिसांचा अभिनव महिलादिन : महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा केला सन्मान 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 04:08 PM2019-03-08T16:08:35+5:302019-03-08T16:10:07+5:30

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सिंहगड रस्ता पोलीस ठाणे अंतर्गत नऱ्हे पोलीस चौकीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या हस्ते  महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. 

Innovative Women's Day celebration by Narhe Police | नऱ्हे पोलिसांचा अभिनव महिलादिन : महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा केला सन्मान 

नऱ्हे पोलिसांचा अभिनव महिलादिन : महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा केला सन्मान 

googlenewsNext

नऱ्हे : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सिंहगड रस्ता पोलीस ठाणे अंतर्गत नऱ्हे पोलीस चौकीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या हस्ते  महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. 

               यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या कि, वर्षभर साफसफाई करून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता साफसफाई महिला कर्मचारी  हे सर्व नागरिकांचे आरोग्य नीट राहावे, यासाठी झटत असतात परंतु त्यांचा सन्मान केवळ एक दिवसांकरिता न होता तो वर्षभर झाला पाहिजे,तसेच तो सन्मान सर्व स्थरातून होणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना साखळी चोरांपासून सावधान बाळगण्यासाठीच्या सूचनाही दिल्या. ग्रामपंचायत महिला सफाई कामगार , नवले हॉस्पिटलमधील महिला सफाई कर्मचारी तसेच परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.  पोलीस उपनिरीक्षक विनोद महांगडे, पोलीस हवालदार अशोक कदम, पोलीस नाईक सुशांत यादव, आशिष ढमाळ ,पोलीस शिपाई राजेंद्र मोरे, गोरखनाथ चिनके आदी यावेळी उपस्थित होते. 

Web Title: Innovative Women's Day celebration by Narhe Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.