इंदापूरकरांची पोटदुखी वाढली, आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:07 AM2018-03-06T03:07:12+5:302018-03-06T03:07:12+5:30

गेल्या आठवड्यापासून इंदापूर नगर परिषदेकडून पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांकडून पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी सोमवारी (दि.५) नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास भेट दिली.

 Indapurakar's stomach grows, stagnant water from the week | इंदापूरकरांची पोटदुखी वाढली, आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणी

इंदापूरकरांची पोटदुखी वाढली, आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणी

Next

इंदापूर - गेल्या आठवड्यापासून इंदापूर नगर परिषदेकडून पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांकडून पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी सोमवारी (दि.५) नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास भेट दिली. पाण्याच्या टाकीची पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना, पाणीपुरवठा विभागाच्या सभापतींनी अद्यापपर्यंत या समस्येची दखल घेतली नसल्याविषयी त्यांनी तीव्रद नापसंती व्यक्त केली.
सविस्तर हकिगत अशी की, उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर नगर परिषदेच्या माळवाडी नं.२ येथील नळपाणी पुरवठा योजनेतून संपूर्ण दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून पिवळसर तवंग असणारे दुर्गंधीयुक्त गाळमिश्रित पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत आहे. हे पाणी प्यायल्यामुळे पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.
पत्रकारांशी बोलताना पोपट शिंदे व श्रीधर बाब्रस यांनी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, सत्ताधारी गटाने अद्यापपर्यंत त्यावर उपाययोजना केलेली नाही. पाणीपुरवठा समितीच्या सभापती मनीषा शिंदे यांनी पाणीपुरवठा विभागाची भेट घेऊन चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या आरोग्याचे काही देणे घेणे नाही, हे स्पष्ट दिसत आहे. अजून उन्हाळ्यास सुरुवात झाली नाही, तोपर्यंतच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गलथान कारभारामुळे संपूर्ण उन्हाळा पार पडेपर्यंत निभाव कसा लागणार, अशी शंका व्यक्त करून, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मिटला नाही तर आम्ही नगर परिषदेच्या ढिसाळ कामाच्या निषेधार्थ नागरिकांसह रस्त्यावर येऊ, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. माळवाडी नं.२ येथील पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात असणाºया जलपर्णी व इतर झाडांच्या लगतचे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी वापरावे लागत आहे.या झाडांच्या वासामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे.नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग पाणी शुद्धीकरणाबाबत कसलाही हलगर्जीपणा करत नाही.सध्या पीएसी पावडर,क्लोरिन, ब्लिचिंग पावडर व बेन्टोनाईट पावडरचा शुद्धीकरणासाठी वापर होत आहे. बेन्टोनाईट पावडरचा साठा संपला होता. मात्र बारामतीहून दोन टन पावडर आणण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अंकुश बोराटे यांनी दिली.

Web Title:  Indapurakar's stomach grows, stagnant water from the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.