मिळकतींचे होणार उपग्रहाद्वारे सर्वेक्षण

By admin | Published: June 21, 2017 06:24 AM2017-06-21T06:24:41+5:302017-06-21T06:24:41+5:30

बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. आवश्यक कामांना प्राधान्य देऊन

Income will be surveyed by satellite | मिळकतींचे होणार उपग्रहाद्वारे सर्वेक्षण

मिळकतींचे होणार उपग्रहाद्वारे सर्वेक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. आवश्यक कामांना प्राधान्य देऊन उर्वरित कामे निधीच्या उपलब्धतेनुसार केली जाणार आहेत. तब्बल ६४ विषय आजच्या सर्वसाधारण सभेत होते. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि विरोधी विकास आघाडीच्या नगरसेवकांनी विविध विषयांच्या चर्चेत सहभाग घेतला. तसेच विकासकामे करताना यापुढे तरी पारदर्शी कारभाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. त्यावर नगराध्यक्षांनी याबाबत कडक सूचना दिल्या आहेत, असे सांगितले. खेळीमेळीच्या वातावरणात विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा बारामतीमध्ये उभारण्यास मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. या वेळी उपाध्यक्ष जय पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे उपस्थित होते. नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये ज्या कामांची आवश्यकता आहे, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. नगरसेवक समीर चव्हाण, अनिता माने, नीलिमा मलगुंडे, सुरेखा चौधर, बाळासाहेब सातव, आशा माने, अतुल बालगुडे, अनघा जगताप, राजेंद्र बनकर, सीमा चिंचकर, सूरज सातव, संतोष जगताप, सत्यव्रत काळे, नीता चव्हाण, वीणा बागल, अश्विनी गालिंदे, नवनाथ बल्लाळ, तरन्नूम सय्यद, अनिता जगताप, गणेश सोनवणे, ज्योती सरोदे, विष्णूपंत चौधर, शारदा मोकाशी, बबलू देशमुख, अशोककाका देशमुख, संजय संघवी, रमेश भोकरे, सुनील सस्ते, मयुरी शिंदे, सचिन सातव, अमर धुमाळ या नगरसेवकांनी शहरातील प्रभागात विकासकामे सुचविली आहेत. त्यांना मंजुरी देण्यात आली.

Web Title: Income will be surveyed by satellite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.