दुधाला किमान २५ रुपये तरी भाव द्या अन्यथा भुकटी अनुदान बंद : महादेव जानकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 09:42 PM2018-05-18T21:42:11+5:302018-05-18T21:42:11+5:30

किमान २५ रुपये दराने दूध खरेदी करावी अन्यथा भुकटीवर दिलेले जाणारे तीन टक्के अनुदान बंद करण्यात येईल अशी तंबी महादेव जानकर यांनी दूध कंपन्यांना दिली

Give milk rate at least 25 rupees, otherwise the powder subsidy is closed : Mahadev Jankar | दुधाला किमान २५ रुपये तरी भाव द्या अन्यथा भुकटी अनुदान बंद : महादेव जानकर 

दुधाला किमान २५ रुपये तरी भाव द्या अन्यथा भुकटी अनुदान बंद : महादेव जानकर 

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात पाच लाख टनापेक्षा जादा दुध पावडरचा साठा अद्याप शिल्लकयेत्या काही दिवसांत शेतक-यांना फायदेशीर ठरेल असा योग्य भावाचा ७०/30 चा कायदा आणणार

पुणे: खासगी कं पन्यांकडून शेतक-यांची होत असलेली पिळवणूक थांबविण्याकरिता कडक पावले उचलणार असून सध्याच्या दुधभाव वाढीच्या ज्वलंत प्रश्नाकरिता शासन क टिबध्द राहणार आहे. राज्यशासनाने दुधाचा भाव २७ रुपये प्रति लीटर सक्तीचा आहे. या दरावर सविस्तर चर्चा करुन तो किमान २५ तरी शेतक-यांना द्यावा. असा सज्जड दम पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी खासगी कंपन्या व सहकारी दुध संघांना दिला आहे. याबरोबरच जे कोणी या दराने दुधखरेदी करणार नाहीत त्यांचे भुकटी अनुदान बंद करणार असल्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. 
    जानकर म्हणाले, सध्या ६० टक्के दुध खासगी, एक टक्का सरकारी आणि ३९ टक्के दूध संकलन हो सहकारी क्षेत्रातून संकलित केले जात आहे़. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुध पावडरचे दर अत्यंत कमी झालेले असून देशात पाच लाख टनापेक्षा जादा दुध पावडरचा साठा अद्याप शिल्लक आहे़. राज्यात उत्पादित होणा-या दुधापैकी ४० टक्के दूधाचा वापर हा पिशवीबंद किंवा अन्य प्रकारे दुध विक्रीसाठी केला जातो़.  उर्वरित दुधापासून दुग्धजन्य पदार्थ उत्पादन होते. तर मोठया प्रमाणावर दूधाची पावडर निर्मिती केली जाते़. या निर्णयानुसार दुग्धव्यवसाय विभागाचे अधिकारी पाहणी करून कारवाई करणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. शासनाने दूध भुकटी उत्पादन करणा-यांना प्रति लिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान मार्च २०१८ मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा २० टक्यांनी जास्त  आहे. हा निर्णय विचार पूर्वकच असल्याचे दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी यावेळी सांगितल़े 
...............
दुध धोरण लवकरच होणार जाहीर 
दुधाला 70 टक्के भाव देण्याकरिता प्रयत्नशील राहणार असून उर्वरीत रक्कम ही दुधावरील प्रक्रियेकरिता वापरण्यात येईल. येत्या काही दिवसांत शेतक-यांना फायदेशीर ठरेल असा योग्य भावाचा ७०/30 चा कायदा आणणार असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच राज्याचे दूध धोरण लवकरच जाहीर करणार असून शेतक-यांसाठी मिल्क फंड उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
 

Web Title: Give milk rate at least 25 rupees, otherwise the powder subsidy is closed : Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.