एफटीआयआयकडून त्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 11:17 PM2017-10-12T23:17:23+5:302017-10-12T23:17:42+5:30

फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय)फिल्म मेकींग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्याथ्यार्ना वसतिगृह सोडण्याचे देण्यात आलेले आदेश अखेर  प्रशासनाने मागे घेतले.

FTII is behind the actions of those students! | एफटीआयआयकडून त्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे!

एफटीआयआयकडून त्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे!

Next

पुणे : फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय)फिल्म मेकींग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्याथ्यार्ना वसतिगृह सोडण्याचे देण्यात आलेले आदेश अखेर  प्रशासनाने मागे घेतले. संवाद फिल्म या प्रोजेक्टसाठी विद्याथ्यार्ना मुदतवाढ दिली जात असल्याचे संचालक भुपेंद्र कॅँथोला यांनी सांगितले. 
फिल्म मेकींग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तिसºया सेमिस्टरच्या संवाद फिल्म या प्राजेक्टसाठी पुरेसा वेळ देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांनी निमिर्तीच्या बैठकीला बहीष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.  विद्यार्थ्यांनी फिल्म मेकींगचे अधिष्ठाता तसेच इन्स्टिट्युटचे संचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यावर विद्यार्थ्यांना  उत्तर देण्यात आले नाही. बहिष्कार टाकल्याने विद्यार्थ्यांना तीन दिवसांच्या आत वसतीगृह सोडण्यास सांगण्यात आले होते. 
याबाबत कँथोला म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, अशी आमची भूमिका आहे. प्रकल्प फिल्म पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांऐवजी तीन दिवसांचा कालावधी द्यायला आम्ही तयार आहोत. एकाही विद्याथ्यार्चे निलंबन केलेले नाही. ज्या पाच विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडा, असे सांगण्यात आले होते, तो निर्णय मागे घेण्यात आला आहे.'
या विद्यार्थ्यांनी नियम बदलण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी सध्या वर्गात अनुपस्थित राहून संचालकांच्या कार्यालसमोर आंदोलन करत आहेत. या ४७ विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच पाच विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कँथोला यांनी हे स्पष्टीकरण दिले.
विभागाचे प्रमुख अमित त्यागी म्हणाले, 'चित्रीकरण तासाप्रमाणे मोजले जाते. विद्यार्थ्यांना तीन दिवस आठ-आठ तास काम करायचे आहे. आम्ही दोन दिवसात बारा-बारा तास काम करा म्हणत आहोत. त्यावरही तीन दिवस मुदत द्यायला तयार आहोत. गेल्या सात वर्षांचा अनुभव असा आहे, की तीन दिवसांमुळे प्रकल्पाला जास्त वेळ लागतो. चित्रपट पूर्ण झाले नाहीत तर विद्यार्थ्यांना आपली क्षमता दाखवता येत नाही. पूवीर्चे प्रकल्प बारगळले म्हणून तर विद्यार्थी अनेक वर्ष संस्थेतच होते. चित्रपट तयार केला नाही, तर विद्यार्थी श्रेयांक पद्धतीनुसार ते उत्तीर्ण होतीलही; पण एफटीआयआयमध्ये चित्रपट करण्याची संधी पुन्हा मिळणार नाही.

Web Title: FTII is behind the actions of those students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.