आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:19 PM2018-05-03T16:19:28+5:302018-05-03T16:19:28+5:30

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि रायगड पोलिसांनी खालापूर येथील हॉटेल लिला इन येथे केलेल्या संयुक्त कारवाईत आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले़.

Five person arrested due to betting on IPL matches | आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले

आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे ग्रामीण, रायगड पोलिसांची कारवाई, १२ लाख २६ हजार १६० रुपयांचा माल जप्त

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि रायगड पोलिसांनी खालापूर येथील हॉटेल लिला इन येथे केलेल्या संयुक्त कारवाईत आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले़. त्यांकडून ११ मोबाईल, १ लॅपटॉप, कॅल्क्युलेटर, १ पोर्टेबल टी व्ही, सेट टॉप बॉक्ससह रोख ९८ हजार ४६० रुपये आणि कार असा १२ लाख २६ हजार १६० रुपयांचा माल जप्त केला आहे़. 
हे पाचही जण निगडी, सोमाटणे फाटा, आकुर्डी, देहुरोड, चिखली येथील राहणारे आहेत़. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट, मॅचवर बेटिंग घेण्यासाठी काही जण सोमाटणे फाटा येथून एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून निघणार असल्याची माहिती बुधवारी समजली़. स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने सोमाटणे फाटा येथे पाळत ठेवली़. काही वेळाने त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक कार देहुरोडकडून तळेगाव दाभाडेकडे जाताना त्यांना दिसली़. त्यांनी या कारचा पाठलाग केला़ ती कार खालापूर मार्गे पनवेल रोडवरील हॉटेल लिला इन या हॉटेलसमोर थांबली़. त्या कारमधील लोक साहित्यासह लॉजमध्ये गेले़. पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने रायगड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून पोलीस पथकाला बोलावून घेतले़. सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी आपल्या पथकासह हॉटेल लिला इन येथे छापा टाकला असता तेथील एका रुममध्ये आयपीएलचे चालू असेल्या क्रिकेट मॅचवर बेटिंग करताना मिळून आले़. तेथे असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले़. त्यांच्याकडील साहित्य जप्त केले आहे़. 
याप्रकरणी रायगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांनी पाच आरोपी व लॉज मॅनेजर अशा ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे़. 
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप, गणेश क्षीरसागर, सहायक फौजदार सुनिल बांदल, हवालदार दत्तात्रय जगताप, शरद बांबळे, नितीन भोर, महेश गायकवाड, तसेच रायगड जिल्हा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, अमोल वळसंग व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली़.

Web Title: Five person arrested due to betting on IPL matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.