बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:23 AM2017-10-20T02:23:20+5:302017-10-20T02:23:35+5:30

पिंपळवंडी येथील काकाडपट्टा शिवारात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वनखात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतक-यांनी केली आहे.

 Farmer Haraan due to leopard scare | बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण

Next

पिंपळवंडी : येथील काकाडपट्टा शिवारात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वनखात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतक-यांनी केली आहे.
येथील काकडपट्टा व बाभूळबन शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, अनेक शेतकºयांची जनावरे फस्त केली आहेत. या ठिकाणी बिबट्याचा कायमच वावर असल्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. पिंपळवंडी परिसर हा बागायती क्षेत्र असलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होत आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे दिवसाही शेतात काम करणे अवघड झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासाठी शेतमजूरसुद्धा मिळत नाहीत. एकीकडे शेतमालाला बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकरी ऊस लावत आहेत, तर दुसरीकडे ऊस लावल्यामुळे बिबट्यांची दहशत वाढली आहे.

काकडपट्टा शिवारात कायमच अगदी दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. जर बिबट्याला खाद्य मिळाले नाही तर तो माणसांवरही हल्ला करु शकतो. या शक्यतेने येथील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
काकडपट्टा शिवारात वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकरी प्रकाश काकडे, विकास काकडे, बाळशिराम काकडे, भाऊसाहेब काकडे, राजेंद्र काकडे, अविनाश वाघ, दत्ता काकडे, रामचंद्र वाघ आदी शेतकºयांनी केली आहे.

Web Title:  Farmer Haraan due to leopard scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे