अनुभवल्या गडकरी यांच्या साहित्यछटा : श्री राम गणेशाय नम:; विविध साहित्यप्रकार सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:42 AM2018-01-30T11:42:41+5:302018-01-30T11:45:43+5:30

भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत ‘राम गणेशाय नम:’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Experience Gadkari's Literature: Shri Ram Ganeshaya Namah; Various literature types presented | अनुभवल्या गडकरी यांच्या साहित्यछटा : श्री राम गणेशाय नम:; विविध साहित्यप्रकार सादर

अनुभवल्या गडकरी यांच्या साहित्यछटा : श्री राम गणेशाय नम:; विविध साहित्यप्रकार सादर

googlenewsNext
ठळक मुद्देउलगडवून दाखविण्यात आला राम गणेश गडकरी यांचा वाङ्मयीन प्रवास आणि जीवनपट रसिक प्रेक्षकांना आला गडकरींचा विनोद आजच्या समाजालाही लागू होत असल्याचा अनुभव

पुणे : ज्येष्ठ नाटककार, प्रतिभावंत कवी आणि हजरजबाबी विनोदी लेखक अशा राम गणेश गडकरींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध साहित्यछटा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली, ती ‘राम गणेशाय नम:’ या कार्यक्रमाद्वारे. 
भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत ‘राम गणेशाय नम:’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या  कोथरुड शाखेद्वारे प्रस्तुत या कार्यक्रमाद्वारे कवी गोविंदाग्रज, विनोदी लेखक बाळकराम म्हणजेच नाटककार राम गणेश गडकरी यांचा वाङ्मयीन प्रवास आणि जीवनपट उलगडवून दाखविण्यात आला. श्रीराम रानडे यांचे संकलन आणि संपादन होते. विजय गोविंद यांनी व शब्दांकन आणि सादरीकरण केले. या वेळी भारतीय विद्याभवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे,  संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.
अवघे ३४ वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या राम गणेश गडकरींच्या काळातील राजकीय-सामजिक वातावरण, त्यांच्या वाचनाचा  व्यासंग, त्यांचे आवडते लेखक, मराठीसह गुजराती आणि इंग्रजी भाषेवर असलेले त्यांचे प्रभुत्व अशा त्यांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांची गुंफण करण्यात आली.  
राम गणेश गडकरींनी विविध साहित्यप्रकार किती सहजपणे हाताळले आणि त्यात आपला प्रतिभासंपन्न ठसा कसा उमटवला, याचा प्रत्यय त्यांच्या नाटकातील निवडक संवाद, कविता आणि त्यांच्या साहित्यातील विनोदी किश्श्यांच्या अभिवाचनातून आला. ‘प्रेमसंन्यास,’ ‘पुण्यप्रभाव,’ ‘राजसंन्यास,’ ‘एकच प्याला’ आणि ‘भावबंधन’ या नाटकातून गडकरींनी ऐतिहासिक आणि सामाजिक विषय हाताळून मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. 
समाजातील विसंगतीचे बारकावे हेरून त्यावर मार्मिक भाष्य करणारा गडकरींचा विनोद आजच्या समाजालाही लागू होत असल्याचा अनुभव या वेळी उपस्थित रसिक प्रेक्षकांना आला. 

Web Title: Experience Gadkari's Literature: Shri Ram Ganeshaya Namah; Various literature types presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे