पीएमपीमध्ये फुकट वर्षासहलीचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:30 PM2018-07-10T16:30:51+5:302018-07-10T16:54:19+5:30

पाऊस लागू नये म्हणून आलो तर ही बसचं गळत असल्याचा अनुभव पीएमपी प्रवासी घेत आहेत. 

Enjoy the free anniversary of PMP! | पीएमपीमध्ये फुकट वर्षासहलीचा मनस्ताप

पीएमपीमध्ये फुकट वर्षासहलीचा मनस्ताप

Next
ठळक मुद्देपीएमपी बसमध्ये बसा आणि अंघोळ करा प्रवासी वैतागले : काचा बसविण्याची मागणी 

पुणे : दुचाकीवर जात असताना पावसात भिजायला लागू  तुम्ही पुण्यातील पीएमपी बसचा पर्याय शोधणार असाल तर तुमची निराशा होण्याची शक्यता आहे.कारण पुण्यातील पीएमपीने प्रवाशांना फुकट वर्षासहलीचा आनंद देण्याची व्यवस्था केली आहे. शहरात धावणाऱ्या सुमारे १५०० बसमधील अनेक बसची मागची काच फुटल्यामुळे थेट पावसात उभं केल्याचे सुख प्रवाशांना देण्यात येत आहे. त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी बसमध्ये रेनकोट घालून उभं राहायला सुरुवात केली आहे . 


         देशात स्मार्ट सिटी म्हणून झळकत असलेल्या पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था कायमच बिकट असते. रस्त्यात बंद पडलेल्या गाड्या, नादुरुस्त गाड्या,प्रचंड दुरावस्थेत असूनही रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांमुळे अनेकदा पीएमपीवर टीका केली जाते. या सर्वाचा परिणाम अर्थात प्रवासी संख्येवर होत असून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने कोट्यवधी पैसे खर्चुनही ही सेवा कधीही फायद्यात आलेली नाही. अशावेळी निदान आहे त्या प्रवाशांना तरी चांगली सेवा मिळावी ही अपेक्षाही फोल ठरताना दिसत आहे. 

          एमएच १२ एचबी १७१९ही बस भर पावसात प्रवाशांना भिजवत घेऊन जात आहे. या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून यापेक्षा रिक्षा परवडली असे एका प्रवाशाने म्हटले. गंधाली पांडे या महिलेने बसमुळे पूर्ण पर्स भिजली असून आता ऑफिसमध्ये जाऊन वाळवत बसावी लागेल असा अनुभव सांगितला. एमएच १२ सीएच ९००४ या बसची अवस्थाही वेगळी नसून ऍडमिशन घेण्यासाठी चाललेल्या विद्यार्थिनीने कागदपत्र भिजून नये बसमध्ये प्रयत्न करावा लागल्याचं सांगितलं. नेमकी पीएमपी तिकिटाच्या पैशात काय करते असा सवालही एका प्रवाशाने केला. 


          या विषयावर संचलन महाव्यवस्थापक विलास बांदल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळ्यापूर्वी वायपर, काचा, छत यांची देखभाल दुरुस्ती केली जात असल्याचे सांगितले. ज्या दिवशी काच नसल्याचे समोर येते त्याच दिवशी ती लगेच बसवण्याच्या सूचना संबंधित डेपोला दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Enjoy the free anniversary of PMP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.