फराळनिर्मितीतून महिलांना रोजगार

By admin | Published: October 17, 2014 11:44 PM2014-10-17T23:44:41+5:302014-10-17T23:44:41+5:30

फराळ बनविण्याच्या माध्यमातून महिलांना दिवसाला 2क्क् ते 25क् रुपये रोजगार मिळत आहे.

Employment from women for employment | फराळनिर्मितीतून महिलांना रोजगार

फराळनिर्मितीतून महिलांना रोजगार

Next
पिंपरी : फराळ बनविण्याच्या माध्यमातून महिलांना दिवसाला 2क्क् ते 25क् रुपये रोजगार मिळत आहे. यामुळे महिला वर्गही घरातील दिवाळीची कामे पाहून दिवाळी फ राळ बनविण्याची कामे करत आहेत. या माध्यमातून महिलांना  रोजगार उपलब्ध होतो. बचत गटाच्या महिलाही रोजगारासाठी दिवाळी      फराळ बनविण्याची कामे करत आहेत. 
धावपळीच्या युगात नोकरी करणा-या महिलांना दिवाळी फ राळ बनवण्यास वेळ अपुरा पडत आहे. यामुळे दिवाळी फराळ विकत घेऊन महिला दिवाळी साजरी करतात. रहाटणी येथील किनारा कॉलनीत गेल्या 1क् वर्षापासून घरगुती दिवाळी फराळ बनविला जात आहे. दिवाळी फराळ बनविण्यासाठी एकूण दहा ते बारा महिला आहेत. 
सर्व महिला एकत्रित येऊन दिवसाला 5क् ते 6क् किलो दिवाळी फराळ बनवितात. गेल्या  पंधरा दिवसापासून     दिवाळी फ राळ या महिला तयार करीत आहेत. दिवाळीर्पयत जवळपास 5क्क् ते 6क्क् किलो फराळ बनवून तयार होतो. लक्ष्मीपूजन व पाडव्यार्पयत सर्व फ राळांची मागणी पूर्ण होते. 
हडपसर, सासवड, राजगुरु नगर, पाषाण, पुणो, पिंपरी-चिंचवड या परिसरातून दिवाळी फ राळ घेण्यासाठी रहाटणी येथे महिलांची गर्दी दिसून दिसून येते. दिवसाला 15क् ते 2क्क् किलो फ राळ या महिला बनवतात. करंजी, चकली, बेसन लाडू, रवा लाडू, मोतीचूर लाडू, गोड शंकरपाळी, खारी शंकरपाळी, पातळ पोहा चिवडा, तिखट शेव, साधी शेवला  मागणी असते. घरगुती दिवाळी फराळ असल्यामुळे घरच्या पदार्थासारखा आस्वाद दिवाळी फराळांना आहे. दिवाळी पदार्थाची बनविण्याची  गुणवत्ता चांगली असल्या कारणाने विकतच्या फराळाला मागणी वाढत आहे. आयटी क्षेत्रतील महिला तसेच परदेशी राहणा:या नातेवाईकांसाठी आठ दिवसा पूर्वीच दिवाळी पदार्थाचे बुकींग केले जाते. दरवर्षी दिवाळी   फराळाची मागणी वाढत चालली आहे.(प्रतिनिधी)
 
फराळाचे दर 
4दिवाळी फराळ खरेदी करण्यासाठी करंजी 35क् रुपये किलो,  चकली 3क्क् रूपये किलो, बेसन लाडू 35क् रूपये कि लो, रवा लाडू 25क् रूपये किलो, मोतीचूर लाडू 25क् किलो रूपये, गोड शंकरपाळी 25क् किलो रूपये, तिखट शेव 25क् किलो रूपये, साधी शेव 25क् किलो रूपये, पातळ पोहा चिवडा 25क् किलो रूपये प्रमाणो आहे.
महिलांची धावपळ
4दिवाळी काही दिवसावर आली असताना घरोघरी महिलांची दिवाळी फराळ बनविण्याची लगबग दिसू लागली आहे. दिवाळीचा किराणा माल खरेदी करून पदार्थ घरोघरी बनवण्यास सुरूवात झाली आहे.
 
पहाटेपासूनच दिवाळी फराळ बनवण्यास सुरूवात क रावी लागते. मदतीला दहा ते बारा महिला असतात. दिवाळी फ राळ बनवल्यामुळे महिलांच्या हातालाही कामाचा वेग प्राप्त झाला आहे. महिलांनाही रोजगार प्राप्त झाल्यामुळे महिला वर्ग आनंदाने दिवाळी फ राळाची कामे करताना दिसत आहेत.
- निर्मला दिवाणो  घरगुती फराळ बनविणारी महिला
दिवाळी फ राळ बनवण्याचा विशेष आनंद होतो. कारण नागरिकांना आम्ही बनवलेला फराळ  खुप आवडतो. उत्कृष्ट प्रकारचा फ राळ आहे यामुळे नागरिक चांगल्या प्रकारे दाद देतात. 
संगीता चौधरी , रहाटणी
फ राळ बनविणो ही एक कला आहे. कुठलाही पदार्थ वाया न घालवता दिवाळी पदार्थ बनविले जातात. कुठल्याही प्रकारच्या यंत्रचा वापर केला जात नाही. सर्व पदार्थ घरगुती बनविल्यामुळे लोकांना ते आवडतात.
लक्ष्मी सवणो, रहाटणी   

 

Web Title: Employment from women for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.