उदयोन्मुख नेतृत्व ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस’ : सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे खानापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 02:36 AM2018-01-28T02:36:28+5:302018-01-28T02:37:01+5:30

तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे.

Emerging Leadership 'Lokmat Sarpanch Award': Khanapur, who is leading all-round development | उदयोन्मुख नेतृत्व ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस’ : सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे खानापूर

उदयोन्मुख नेतृत्व ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस’ : सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे खानापूर

Next

- संतोष म्हस्के
नेरे : तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. गावातील नागरिकांचा रोगराई पासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे, या कामाची दखल घेऊन गावचे सरपंच चंद्रकांत नागरे यांना उदयोन्मुख नेतृत्व म्हणून ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे.
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील दुर्गम-डोंगरी भागातील बारा
वाड्या, एक हजार उंबरठा तसेच ३ हजार लोकसंख्या असणाºया
खानापूर (ता. भोर) गावाची नागरिकांच्या एकजुटीतून व लोक सहभागातून विकासाकडे वाटचाल चालू आहे.
गावातील मूलभूत व भौतिक सुविधा तसेच नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना याच्यावर भर देऊन विकासाचा ध्यास हाती खानापूर येथे करण्यात आले आहे.
तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. गावातील नागरिकांचा रोगराई पासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे. कॉईनबॉक्स वरून पाच रुपयांच्या नाण्यावर गावातील लोकांना २० लिटर पाणी देण्यात येणार आहे.
मागील काळातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी गावचा परीपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जनतेच्या मूलभूत सुखसोयींसाठी तसेच गावचा विकास परिपूर्ण करण्यासाठी नागरे यांची धडपड चालू आहे.
खानापूर येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या नवीन मंदिराचे ४५ लक्ष रुपयांचे बांधकाम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहे. गावात शासकीय नवनवीन जनहिताच्या विकासाच्या सुविधा मिळवून त्या राबवण्यात येत आहेत.

गावच्या बारा वाड्यात चौथी पर्यंत पाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बारावीपर्यंत एक माध्यमिक विद्यालय, बारा वाड्यामध्ये पाच अंगणवाडी केंद्र असून याकडे सरपंचांचे पूर्ण लक्ष असते.
डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले खानापूर गाव निसर्गरम्य वातावरणात सुखाने नांदत आहे.

१०० टक्के हगणदरीमुक्त - खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे .
नांदेड पॅटर्न -गावातील नागरिकांचा रोगराईपासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्ड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे.
पाण्यासाठी एटीएम यंत्रणा - कॉईनबॉक्सवरून पाच रुपयांच्या नाण्यावर गावातील लोकांना २० लिटर पाणी देण्यात येणार आहे.

कामाची पावती मिळाली

आतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. मात्र गावचा सरपंच म्हणून तसेच समाजहिताचे काम करताना ‘लोकमत’ने खेडो-पाड्यांच्या सरपंचांच्या कामाची पावती म्हणून आम्हाला गौरविले व माझ्या गावाला जिल्ह्याच्या नकाशावर नावलौकिक दिला त्याबद्दल लोकमत समूहाचे अभिनंदन करतो असे नांगरे यांच्याकडून सांगण्यात आले.

पावसाच्या पाण्यावर शेती

गावातील बहुतांशी शेतकरी शेतीला पाण्याच्या तुटवडा भासत असल्याने पावसाच्या पाण्यावर प्रामुख्याने भात पिकाचे उत्पन्न घेतात.

Web Title: Emerging Leadership 'Lokmat Sarpanch Award': Khanapur, who is leading all-round development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.