भीमाशंकरला पहाटे भाविकांची गर्दी, शासकीय पूजा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:07 AM2024-03-08T09:07:17+5:302024-03-08T09:11:34+5:30

मध्यरात्री बारा वाजल्या पासून भाविकांची रांग लागली होती. महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता शासकिय पुजा झाल्यानंतर ख-या अर्थाने यात्रेला व दर्शनाला सुरवात झाली.

Early morning rush of devotees to Bhima Shankar, | भीमाशंकरला पहाटे भाविकांची गर्दी, शासकीय पूजा संपन्न

भीमाशंकरला पहाटे भाविकांची गर्दी, शासकीय पूजा संपन्न

भीमाशंकर : जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय च्या जय घोषात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्र भरली आहे.  महाशिवरात्रीला पहाटेचे दर्शन पवित्र मानले जात असल्याने पहाटे दर्शनाला जास्त गर्दी दिसली. 

मध्यरात्री बारा वाजल्या पासून भाविकांची रांग लागली होती.  महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता शासकीय पूजा झाल्यानंतर ख-या अर्थाने यात्रेला व दर्शनाला सुरवात झाली. भीमाशंकर मधील दुकानदारांनी गर्दी होण्याचा अंदाज असल्याने माल भरला आहे. 

महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार महेश लांडगे, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश कौदरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण, यांच्या उपस्थितीत शासकीय पुजा पार पडली.  देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, संजय गवांदे, विनायक कोडिलकर, रत्नाकर कोडिलकर यांच्या वेदपठनात शासकीय पुजा झाली. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. महाशिवरात्र यात्रे निमीत्त भीमाशंकर देवस्थान टस्ट, पोलिस विभाग यांनी चोख तयारी केली आहे.

Web Title: Early morning rush of devotees to Bhima Shankar,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.