टाकाऊपासून टिकाऊ वस्तू अन् फन फेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 02:36 AM2017-12-10T02:36:14+5:302017-12-10T02:36:45+5:30

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इआॅन ग्यानंकुर इंग्लिश शाळेत विज्ञान प्रदर्शन आणि फन फेअर मोठ्या उत्साहात साजरा झाला. पठारे विद्यालयाचे मुख्याध्यापक सीताराम बिडगर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 Durable items and fun feathers | टाकाऊपासून टिकाऊ वस्तू अन् फन फेअर

टाकाऊपासून टिकाऊ वस्तू अन् फन फेअर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंदननगर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इआॅन ग्यानंकुर इंग्लिश शाळेत विज्ञान प्रदर्शन आणि फन फेअर मोठ्या उत्साहात साजरा झाला.
पठारे विद्यालयाचे मुख्याध्यापक सीताराम बिडगर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संदीप कदम, सहायक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव, नगरसेवक महेंद्र पठारे, सुनील ढगे, मनोज नेवासकर यांनी प्रदर्शनास उपस्थित होते. यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे म्हणाले, की शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान विषयाची गोडी निर्माण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेव जाधव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. ते म्हणाले, विज्ञान क्षेत्रातील शास्रज्ञांचा थोर आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे काळाची गरज आहे. प्रदर्शनाबरोबर शाळेतील शिक्षकांनी खाद्यपदार्थांचे छोटे दुकान लावले होते. त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ स्वत: शिक्षकांनी तयार करून विक्रीसाठी मांडले होते.
संदीप कदम म्हणाले की, प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कृतीप्रवण वृत्तीला वाव मिळतो. कल्पकतेला चालना मिळते.’’ या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ साहित्याची निर्मिती, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, भविष्यातील उर्जास्रोत, शेती तंत्रज्ञान, पाणी शुद्धीकरण दळणवळण, पर्यावरण संरक्षण, उपग्रह प्रक्षेपक आदी विषयांवर प्रयोग केले.
 

Web Title:  Durable items and fun feathers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे