जिल्हास्तरीय स्पर्धेस पाच, विभागीय स्पर्धेस दहा गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 02:54 AM2019-01-28T02:54:47+5:302019-01-28T02:55:05+5:30

जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही क्रीडागुण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

District level five, five divisional tournaments, ten points | जिल्हास्तरीय स्पर्धेस पाच, विभागीय स्पर्धेस दहा गुण

जिल्हास्तरीय स्पर्धेस पाच, विभागीय स्पर्धेस दहा गुण

Next

पिंपरी : जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही क्रीडागुण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळताना पहिले ३ क्रमांक मिळविणाºया खेळाडूंना ५ गुण तर विभागीय स्पर्धेत खेळणाºया खेळाडूंना १० गुण या पद्धतीने क्रीडा सवलतीचे गुण दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून दिले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबतचे शुद्धीपत्रक राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शुक्रवारी जारी केले. पूर्वी राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील खेळाडूंना क्रीडा सवलतीचे गुण दिले जायचे. जिल्हा तसेच विभागीय स्तरावरील स्पर्धेत खेळणाºया खेळाडूंना हे गुण मिळत नव्हते. यामुळे खेळाडूंचे नुकसान होत होते. याबाबत क्रीडा संघटनांसह पालकांनीही संताप व्यक्त केला. दरम्यान, २० डिसेंबर २०१८ ला जाहीर झालेल्या शासन निर्णयात जिल्हास्तरीय, विभागीय तोच राज्यस्तरीय स्पर्धांत खेळणाºया विद्यार्थ्यांना पहिल्या ३ क्रमांकासाठी अनुक्रमे ३, ५, ७ गुण देण्यात आले होते. मात्र, हे अत्यंत कमी गुण असल्याने याबाबत नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे या गुणांमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात झालेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’च्या समारोपापूर्वी दिले होते. क्रीडामंत्र्यांनी आश्वासन पूर्ण करताना जिल्हा तसेच विभागीय स्पर्धेत खेळणाºया विद्ययार्थ्यांना समाधानकारक गुण जाहीर केले आहेत.

जिल्हास्तरावरील स्पर्धेत पहिल्या तिन्ही क्रमांकांना ५ गुण देण्यात येतील. विभागीय स्पर्धेतील पहिल्या ३ क्रमांकाच्या खेळाडूंना १० गुण मिळणार असून सहभागासाठी ५ गुण असतील. यासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १५ गुण असून सहभागासाठी १० अथवा १२ गुण असतील. जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर सहभाग असल्यास १० गुण व विभाग स्तरावरुन राज्य स्तरावर सहभाग असल्यास १२ गुण दिले जातील. राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या ३ क्रमांकासाठी २० गुण असून सहभागासाठी १५ गुण मिळतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाºया खेळाडूंना २५ गुण (पहिले तीन क्रमांक) असून सहभागासाठी २० गुण असतील.

असे मिळणार गुण...
क्रीडा स्पर्धा                 प्रावीण्य गुण*     सहभागी गुण
जिल्हास्तरीय स्पर्धा              ५                      ००
विभागीय स्पर्धा                  १०                      ०५
राज्यस्तरीय स्पर्धा              १५              १० अथवा १२
राष्ट्रीय स्पर्धा                      २०                       १५
आंतरराष्ट्रीय स्पर्धा             २५                      २०

एनसीसी, स्काऊट/गाईडच्या विद्यार्थ्यांना मिळणारे गुण
विभाग शिबिर / संचलन गुण
एनसीसी बेसिक लीडरशिप कॅ म्प (बीएलसी)          ३ गुण
एनसीसी पूर्व प्रजासत्ताकदिन शिबिर                       ५ गुण
एनसीसी प्रजासत्ताकदिन संचलन,शिबिर                १० गुण
एनसीसी राष्ट्रीय स्तर, शिबिर / संलग्न स्पर्धाविजेते    १५ गुण
एनसीसी आंतरराष्ट्रीय यूथ एक्सचेंज                        २० गुण
स्काऊट व गाईड राज्यपाल पदकप्राप्त विद्यार्थी       ३ गुण
स्काऊट व गाईड आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबिर        १० गुण

Web Title: District level five, five divisional tournaments, ten points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.