तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराचे वितरण १५ फेब्रुवारीला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 09:10 PM2019-02-06T21:10:57+5:302019-02-06T21:11:12+5:30

ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन

Distribution of Tamasha Samrajani Vithabai Narayanagankar Lifetime Achievement on 15th February | तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराचे वितरण १५ फेब्रुवारीला 

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराचे वितरण १५ फेब्रुवारीला 

Next

पुणे : राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला असून, १५ फेब्रुवारीला पुणे येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


गतवर्षीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार मधुकर नेराळे यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५ लाख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने पाच दिवसाच्या ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ढोलकीफड तमाशा महोत्सव १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वाघोली बाजारतळयेथे आयोजित करण्यात आला आहे.


      ढोलकीफड तमाशा महोत्सवात दरदिवशी एका लोकनाट्य मंडळाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारी १४ फेब्रुवारी रोजी हरिभाऊ बडे नगरकर सह शिवकन्या बडे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शुक्रवारी १५ फेब्रुवारी रोजी भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शनिवारी १६ फेब्रुवारी रोजी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ, रविवारी १७ फेब्रुवारी रोजी मालती इनामदार नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, सोमवारी १८ रोजी मंगला बनसोडे करवडीकर सह नितीन बनसोडे करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ हि लोकनाट्य मंडळे ढोलकीफड तमाशा महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.

Web Title: Distribution of Tamasha Samrajani Vithabai Narayanagankar Lifetime Achievement on 15th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.