शाश्वत विकासासाठी बांबू जनजागृतीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:46 AM2018-09-18T01:46:07+5:302018-09-18T01:46:25+5:30

महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी व राहुरी कृषी विद्यापीठातर्फे पुढाकार

The determination of Bamboo public awareness for sustainable development | शाश्वत विकासासाठी बांबू जनजागृतीचा निर्धार

शाश्वत विकासासाठी बांबू जनजागृतीचा निर्धार

Next

पुणे : बांबू हे नगदी पीक आहे. कोणतीही काळजी न घेता हे पीक वर्षानुवर्षे उत्पन्न देणारे आहे. तरीदेखील त्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष आहे. हे पीक अधिक प्रमाणात घ्यावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुली, महाराष्टÑ वृक्ष संवर्धन व बांबू असोसिएशन आॅफ इंडिया महाराष्टÑतर्फे यंदा जनजागृती करण्यात येत आहे. शाश्वत विकासासाठी बांबू ही संकल्पना घेऊन यंदा जागतिक बांबू दिनानिमित्त (दि. १८) हा पुढाकार घेण्यात आल्याची माहिती महाराष्टÑ वृक्ष संवर्धन समितीचे सुनील भिडे यांनी दिली.
बांबू लागवडीखालील क्षेत्रफळाचा विचार करता भारत जगात सगळ्यात पुढे आहे. अगदी चीनच्यासुद्धा, परंतु बांबूचा वापर करून त्यापासून वस्तू निर्मिती व त्याची निर्यात यामध्ये जगात आपला सोळावा क्रमांक लागतो. अगदी म्यानमार, व्हिएतनाम सारखे छोटे देशही आपल्या पुढे आहेत. भारतात सुमारे १३० पेक्षा अधिक स्थानिक प्रजाती सद्य:स्थितीत ज्ञात आहेत. त्याविषयी पुरेसे संशोधन झालेले नाही. शोध घेतला तर अजून स्थानिक प्रजाती निश्चित उजेडात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, बांबूचे नियोजनबद्ध उत्पादन व उत्पादनानंतर बांबूपासून विविध वस्तूंची निर्मिती व निर्यात याविषयी शेतकºयांमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये शासकीय योजनांची माहितीदेखील शेतकºयांना देण्यात येणार आहे.
शेतीच्या बांधावर व शेतीमध्येसुद्धा उपलब्ध जागे बांबूची लागवड करता येते. बदलत्या हवामानात खंबीरपणे तोंड देत खूप वर्षे रोख उत्पन्न मिळते. तसेच जमिनीत ओलावा साठवून ठेवायला मदत होते. शेतजमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची भरही यामुळे घालता येते, असे बहुपयोगी बांबूबाबत जनजागृतीचा उपक्रम उद्यापासून (दि. १८) होत आहे, असे भिडे यांनी सांगितले.

आज बांबूची शास्त्रीय ओळख करून देणार
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १८) शिरनामे सभागृह, महात्मा फुले कृषी महाविद्यालय परिसरात सायंकाळी ४ वाजता याबाबत कार्यक्रम होणार आहे. नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत प्रमुख पाहुणे असतीला.

Web Title: The determination of Bamboo public awareness for sustainable development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.