शहरात डेंगीचा उद्रेक

By admin | Published: August 1, 2014 05:23 AM2014-08-01T05:23:05+5:302014-08-01T05:23:05+5:30

शहरात आज दिवसभरात डेंगीचे ५१ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जुलै महिन्यातील डेंगीच्या रुग्णांची संख्या ६३० वर पोहोचली आहे

Dengue eruption in the city | शहरात डेंगीचा उद्रेक

शहरात डेंगीचा उद्रेक

Next

पुणे : शहरात आज दिवसभरात डेंगीचे ५१ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जुलै महिन्यातील डेंगीच्या रुग्णांची संख्या ६३० वर पोहोचली आहे. यावरून शहरात डेंगीचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डेंगीमुळे पुणेकरांचे आरोग्य संकटात आलेले असताना पुणे महापालिका मात्र अजूनही कीटकनाशक खरेदीतच अडकली आहे. अजूनही पालिकेला आवश्यक असलेल्या कीटकनाशकांची खरेदी करता आलेली नाही. यावरून येत्या काही दिवसांत शहरात डेंगीची स्थिती अधिक तीव्र होईल, हे स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या वर्षात एका महिन्यात डेंगीचे ६३० रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. यामध्ये दोन व्यक्तींना आपला जीवही गमावावा लागला आहे. जून महिन्यात शहरात डेंगीचे २४९ रुग्ण सापडले होते. त्याअगोदर या रुग्णांची संख्या महिनाकाठी ५०च्या आत होती. महत्त्वाचे म्हणजे, डेंगीचा उद्रेक या वर्षीच शहरात झालेला नाही. त्याअगोदर सलग दोन वर्षे पुण्यामध्ये डेंगीने थैमान घातले आहे. त्यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पण त्यातून कोणताही धडा पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतलेला नाही. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीच्या काळातच त्यांची वाढ रोखण्यासाठी ज्या कीटकनाशकांच्या फवारणीची आवश्यकता आहे, तीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
पालिकेकडील कीटकनाशके संपल्याच्या बातम्या वेळोवेळी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने तातडीने महिन्याभरापूर्वी औषधखरेदी केली. त्यात धूर फवारणीसाठी लागणारे पायरॅथम, जलपर्णीनाशक ग्लायसोफेट
आणि जेथे रुग्ण सापडले,
त्या भागातील घरांमध्ये औषधफवारणी करण्यासाठी वापरले जाणारे ब्रायफ्रेन्थीम ही कीटकनाशके घेण्यात आली. पण सध्या शहरामध्ये डासांची पैदास होत असल्याने
त्यांना रोखण्यासाठी अळीनाशक टेमिफॉस व बीटीआय या कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे.
पण प्रत्यक्षात ही औषधेच घेण्यात आलेली नाहीत. राज्यशासनाच्या दरानुसार ही कीटकनाशके देण्यास कोणतीही कंपनी पुढे आलेली नाही. त्यामुळे पालिकेने शॉर्ट टेंडर लावले
आहे. मात्र, त्याचे काम
अगदी संथगतीने सुरू आहे. यामुळे शहरात डासांचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. लवकर ही औषधे आली
नाही तर शहरातील स्थिती
हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Dengue eruption in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.