गौराईसह गजानन, घराघरात केली जातेयं अाकर्षक सजावट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 07:47 PM2018-09-16T19:47:02+5:302018-09-16T20:02:54+5:30

सार्वजनिक गणेश मंडळांप्रमाणे घरातही नागरिक अाकर्षक सजावट करत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत अाहे.

Decorative decorations in the house | गौराईसह गजानन, घराघरात केली जातेयं अाकर्षक सजावट

गौराईसह गजानन, घराघरात केली जातेयं अाकर्षक सजावट

googlenewsNext

पुणे : गणाेशाेत्सव असल्याने सर्वत्र अानंदाचे, चैतन्याचे वातावरण अाहे. विविध गणेश मंडळांनी अाकर्षक असे देखावे तयार केले अाहेत. ते पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत अाहेत. सार्वजनिक गणेश मंडळांप्रमाणे नागरिक ही अापल्या स्वतःच्या घरात अाकर्षक सजावट करताना दिसत अाहेत. खास करुन गाैरींसाठीची सजावट लक्ष वेधून घेत अाहे. त्यामुळे अाता घरातही अाकर्षक सजावट केलेली पाहायला मिळत अाहे. 
       

पुण्यातील काेथरुड भागामधील देवयानी झांझले यांच्या घरी गाैरी गणपतीची अाकर्षक सजावाट करण्यात अाली अाहे. त्यांचा घरातील हाॅलच्या अर्ध्या भागात त्यांनी गावाकडील घर तयार केले अाहे. त्यासाठी त्यांनी व त्यांच्या घरच्यांनी मेहनत घेतली अाहे. टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी हा देखावा साकारला अाहे. जुन्या गाद्यांपासून त्यांनी काही बाहुल्या तयार केल्या. त्याचबराेबर पेंड वापरुन त्या घराला गावाकडची ठेवन देण्याचा प्रयत्न करण्यात अाला अाहे. गेली अनेक वर्षे झांझले या त्यांचे पती विशाल झांझले व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने अाकर्षक देखावा तयार करत असतात. त्यांचा देखावा पाहण्यासाठी शेजारील नागरिक गर्दी करत असतात.  याप्रमाणेच जुन्या सांगवीतील छायाबाई गायकवाड यांच्या घरी हलता देखावा तयार करण्यात अाला अाहे. त्यांनी अापल्या घरात एका गावाची प्रतिकृती तयार केली अाहे. त्यात महिला विविध कामे करत असल्याचे तसेच विविध खेळ खेळत असल्याचे दाखविण्यात अाले अाहे. त्याला अाकर्षक राेषणाई सुद्धा करण्यात अाली अाहे. गणपती अाणि गाैरींच्या चाैहाेबाजूंनी फळे तसेच फराळाची अारास देखील करण्यात अाली अाहे. यांचा देखावा पाहायला देखील माेठी गर्दी हाेत असते. 


    कर्वेनगरमधील सुनीता माेकाशी यांनी हिमालयाचे प्रतिरुप साकारले अाहे. त्यात धबधबा सुद्धा तयार करण्यात अाला अाहे. गणपतीची मुर्ती अाणि त्या शेजारी गाैरी बसविण्यात अाल्या अाहेत. माेकाशी यांची सजावट देखील नागरिकांच्या अाकर्षणाचा विषय झाली अाहे. 

Web Title: Decorative decorations in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.