Pune: लाॅ काॅलेज रस्ता भागात दराेड्याच्या तयारीतील टाेळक्याच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 11:38 AM2023-08-23T11:38:14+5:302023-08-23T11:40:43+5:30

लाॅ काॅलेज रस्त्यावर मध्यरात्री एका बँकेजवळ चोरट्यांची टोळी थांबली होती...

Deccan Police arrested a gang of thieves who were preparing to commit a robbery in the Law College Road area | Pune: लाॅ काॅलेज रस्ता भागात दराेड्याच्या तयारीतील टाेळक्याच्या मुसक्या आवळल्या

Pune: लाॅ काॅलेज रस्ता भागात दराेड्याच्या तयारीतील टाेळक्याच्या मुसक्या आवळल्या

googlenewsNext

पुणे : लाॅ काॅलेज रस्ता परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला डेक्कन पोलिसांनी जेरबंद केले. चोरट्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जसपालसिंग जपानसिंग जुन्नी (वय २०, रा. भारतनगर, पिंपरी), कुलदीपसिंग युवराजसिंग जुन्नी (वय २०, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), नसीबसिंग रणजितसिंग दुधानी (वय १८, रा. हनुमाननगर, सोलापूर), गौरव शंकर राठोड (वय १९, रा. गोल्डन चौक, चाकण, ता. खेड, जि. पुणे), अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

त्यांच्यासाेबत असलेल्या एका अल्पवयीन साथीदारासही ताब्यात घेतले असून, एक आराेपी पसार झाला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लाॅ काॅलेज रस्त्यावर मध्यरात्री एका बँकेजवळ चोरट्यांची टोळी थांबली होती, चोरटे दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जुन्नी, दुधानी, राठोड यांच्यासह अल्पवयीन साथीदाराला पकडले. त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेला. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करीत आहेत.

Web Title: Deccan Police arrested a gang of thieves who were preparing to commit a robbery in the Law College Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.