डेक्कन एक्सप्रेस आता १५ मिनिटे सुटणार लवकर; रेल्वेगाड्यांच्या वेळेत आजपासून बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 06:34 PM2017-10-31T18:34:07+5:302017-11-01T11:28:25+5:30

भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकात १ नव्हेंबरपासून बदल होत असून पुणे विभागातील काही गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे़.

Deccan Express will soon be available for 15 minutes; Changes in Train Time | डेक्कन एक्सप्रेस आता १५ मिनिटे सुटणार लवकर; रेल्वेगाड्यांच्या वेळेत आजपासून बदल

डेक्कन एक्सप्रेस आता १५ मिनिटे सुटणार लवकर; रेल्वेगाड्यांच्या वेळेत आजपासून बदल

googlenewsNext

पुणे : भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकात १ नव्हेंबरपासून बदल होत असून पुणे विभागातील काही गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे़ त्यात पुण्याहून सुटणारी पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस (११००८) ही गाडी आता दुपारी १५़३० ऐवजी १५ मिनिटे अगोदर १५़१५ वाजता सुटणार आहे़ मुंबईला ही गाडी १९़३५ ऐवजी १९़१७ वाजता पोहचेल़
याशिवाय पुणे -इंदौर (२२९४३) ही आठवड्यात पाच दिवस चालणारी तसेच पुणे -जयपूर (१२९३९) ही आठवड्यात दोन दिवस चालणारी एक्सप्रेस दुपारी १५़२० ऐवजी १५ मिनिटे उशीरा १५़३५ वाजता सुटणार आहे़
दौंड -पुणे डेमू (७१४०८) ही दौंडवरुन १२़४५ वाजता सुटून पुणे स्टेशनवर आता १४़२३ वाजता पोहचेल़ पुणे -दौंड (७१४०९) ही डेमू पुणेहून १४़२० निघण्याऐवजी १४़४० वाजता सुटेल व दौंडला १६़५८ वाजता पोहचेल़ दौंड -पुणे (७१४१०) डेमू दौंडहून १७़१० वाजता सुटून पुणे स्टेशनवर १८़५० वाजता पोहचेल़

Web Title: Deccan Express will soon be available for 15 minutes; Changes in Train Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.