बारामती तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 08:27 PM2019-04-09T20:27:27+5:302019-04-09T20:29:07+5:30

बारामती तालुक्यात गेल्या तीन दिवसांत कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे.

Debtor farmer suicides in Baramati taluka | बारामती तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बारामती तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकर्ज फेडता न आल्याने त्यांनी मंगळवारी शेतात विष पिऊन आत्महत्या

पारवडी  :  पारवडी (ता. बारामती) गायकवाड वस्ती येथील शेतकरी राजेंद्र बाळासो गायकवाड (वय ३६) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतामध्ये दुपारी एकच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा, एक मुलगी, आईवडील तसेच एक भाऊ आहे. 
बारामती तालुक्यात गेल्या तीन दिवसांत कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे. गायकवाड यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी मंगळवारी शेतात विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या जवळ  कर्ज बाजारी पणाला कंटाळल्यामुळे स्वेच्छेने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केलेला कागद मिळाला आहे. याबाबत बारामती पोलीस ठाण्यातील तपासी अंमलदार ए. के. खेडकर अधिक तपास घेत आहेत, अशी माहिती पारवडीचे पोलीस पाटील धनंजय शिंदे यांनी दिली. दरम्यान,शेतकरी गायकवाड यांनी शेतीसाठी बँकेसह, खासगी सावकारांकडुन कर्ज घेतल्याची परीसरात चर्चा आहे.
————————

Web Title: Debtor farmer suicides in Baramati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.