आम्हाला निष्क्रिय आमदार म्हणणारे किती सक्रिय होते : दत्तात्रय भरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 12:34 AM2019-02-03T00:34:10+5:302019-02-03T00:34:22+5:30

इंदापूर तालुक्यात जो कामे करतो त्याचे नाव जनता घेतल्याशिवाय राहत नाही. मात्र, आम्हांला निष्क्रिय आमदार म्हणणारे किती सक्रिय होते,हे जनताच सांगेल

Dattatreya bharane attack on Harshwardhan Patil | आम्हाला निष्क्रिय आमदार म्हणणारे किती सक्रिय होते : दत्तात्रय भरणे

आम्हाला निष्क्रिय आमदार म्हणणारे किती सक्रिय होते : दत्तात्रय भरणे

Next

इंदापूर  - तालुक्यात जो कामे करतो त्याचे नाव जनता घेतल्याशिवाय राहत नाही. मात्र, आम्हांला निष्क्रिय आमदार म्हणणारे किती सक्रिय होते,हे जनताच सांगेल, असा टोला आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला.
इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथे विश्रामगृह व वॉल कंपाउंड अशा ५ कोटी ७३ लाख रुपयांच्या पर्यटन विकासकामांचे भूमिपूजन आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भरणे बोलत होते.

भरणे म्हणाले, सामान्यांसाठी काम करताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवूनच आपण मदत करणे आवश्यक आहे.
गंगावळण पर्यटनस्थळ व्हावे म्हणून, महारुद्र पाटील यांच्यासह स्वत: मुंबईला फाईल घेऊन केलेल्या पाठपुराव्याला यश आले. यावेळी मंगलसिद्धीचे अध्यक्ष राजेंद्र तांबिले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पवार, अशोकराव घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. महारुद्र पाटील यांच्या प्रयत्नातूनच गंगावळण गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी किसनराव जावळे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, कार्याध्यक्ष अमोल भिसे, अरविंद वाघ, शिवाजीराव इजगुडे, अनिल बागल, तुषार घाडगे, राजेंद्र गोलांडे, जितेंद्र गिड्डे, उत्तरेश्वर गोलांडे, अनिल काळे, दत्तात्रय बाबर, वसंत आरडे, सरपंच देवीदास वगरे, उपसरपंच प्रतिभा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेकडून २० लाख रुपये मंजूर...
कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी अगोदरच हजेरी लावत सव्वा किलोमीटर वॉकिंग ट्रॅकसाठी १० लाख रुपये मंजूर व दोन सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रुपये असा एकूण २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. गंगावळण गावाला पर्यटनस्थळ म्हणून राज्यात ओळख निर्माण करून देऊ, अशी ग्वाही दिली.

Web Title: Dattatreya bharane attack on Harshwardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.