समाजाने रुग्णांना उभारी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:23 AM2018-01-17T05:23:29+5:302018-01-17T05:23:37+5:30

मानसिक आजार हे मेंदूशी संबंधित असतात. अत्याधुनिक औषधांनी व उपचारांनी या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. सुरुवातीलाच रुग्णांना योग्य उपचार

 The community should raise the patients | समाजाने रुग्णांना उभारी द्यावी

समाजाने रुग्णांना उभारी द्यावी

Next

पुणे : मानसिक आजार हे मेंदूशी संबंधित असतात. अत्याधुनिक औषधांनी व उपचारांनी या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. सुरुवातीलाच रुग्णांना योग्य उपचार मिळाल्यास ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. नातेवाइकांनी रुग्णांच्या उपचाराला महत्त्व दिले पाहिजे. समाजानेही त्यांना उभारी देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीष रत्नपारखी यांनी व्यक्त केली.
मानसोपचार, व्यसनमुक्ती, पुनर्वसन यासाठी कार्यरत असणाºया मानसवर्धन सेंटर या मानसोपचार केंद्राच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांसाठी कार्यशाळा तसेच मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी डॉ. योगेश पोकळे, डॉ. तृप्ती वेदपाठक, डॉ. अश्विनी कुलकर्णी यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. मानसिक आजारांबाबत जनजागृती रॅलीही काढण्यात आली होती.
पोकळे म्हणाले, ‘‘व्यसन हाही मेंदूशी संबंधित आजार आहे. व्यसनाधीनतेचे प्रमाण सर्व वयोगटांमध्ये वाढत आहे. मानसिक रुग्ण तसेच व्यसनाधीन पुनर्वसनामुळे आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतात, असे मत वेदपाठक यांनी व्यक्त केले.

Web Title:  The community should raise the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.