पंतप्रधानांचे मौनच बोलके, वाढत्या असहिष्णुतेबाबत भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 05:41 AM2017-11-24T05:41:20+5:302017-11-24T05:41:51+5:30

पुणे : एरव्ही प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्यासाठी टिष्ट्वट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल आजवर जाहीरपणे काहीच बोललेले नाहीत. त्यांचे मौनच पुरेसे बोलके आहे

Comment on the silence of the Prime Minister, increasing intolerance | पंतप्रधानांचे मौनच बोलके, वाढत्या असहिष्णुतेबाबत भाष्य

पंतप्रधानांचे मौनच बोलके, वाढत्या असहिष्णुतेबाबत भाष्य

googlenewsNext

पुणे : एरव्ही प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्यासाठी टिष्ट्वट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल आजवर जाहीरपणे काहीच बोललेले नाहीत. त्यांचे मौनच पुरेसे बोलके आहे. गौरी लंकेश यांची हत्या असो की गोमांस, गोरक्षण, चित्रपटांना विरोध अशा मुद्द्यांना पंतप्रधानांची मूकसंमती तर नाही ना, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
देशातील असहिष्णुता, विचारवंतांची हत्या, चित्रपटांना होणारा विरोध, भाजपा नेत्यांकडून कलाकारांना मिळणाºया धमक्या या पार्श्वभूमीवर चव्हाण बोलत होते. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चव्हाण म्हणाले, ‘एकीकडे महिला वैमानिक हवाई दलात सहभागी होत असल्याबद्दल मोदी कौतुकाचा वर्षाव करतात. मात्र, गौरी लंकेश यांची हत्या असो की चित्रपटांना होणारा विरोध, याबाबत मात्र त्यांच्याकडून कोणतीही टिप्पणी केली जात नाही. कदाचित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामुळे ते स्पष्ट भूमिका घेत नाहीत. कायद्याच्या राज्यात हे चालणार नाही, असे त्यांनी खडसावून सांगायला हवे. देशातील असहिष्णुता वाढत असताना पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका घेतल्यास हे प्रकार थांबू शकतील. मात्र, त्यांना हे प्रकार थांबवायचे आहेत का, हा
मूळ प्रश्न आहे. कोणतीही टिप्पणी
न करणे म्हणजे मूकसंमती
देण्यासारखे आहे. त्यांचे मौनच बोलके आहे.’
>रोजगार कुठे गेले?
मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी १० टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यात गेल्या ३ वर्षांत ७० लाख रोजगार निर्माण झाले का, असा प्रश्न चव्हाण यांनी केला.
‘उद्योग आणि रोजगाराची स्थिती’ या विषयावर गुरुवारी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा असतो. उद्योग क्षेत्राचा थेट संबंध रोजगारनिर्मितीशी असतो. नोटाबंदीच्या निर्णयाचा रोजगारावर विपरीत परिणाम झाला. सीएमआयई या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१७च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २० लाख रोजगार नष्ट झाले.’ नारायण राणे यांच्या पक्षाला भाजपाने उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात सर्व पक्ष एकत्र येतील, असे सूतोवाचही चव्हाण यांनी केले.

Web Title: Comment on the silence of the Prime Minister, increasing intolerance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.