चासकमानचा डावा कालवा फुटण्याचा धोका, रेटवडीत मोठी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:02 AM2018-08-18T00:02:30+5:302018-08-18T00:14:42+5:30

रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत.

Chasammaan's left canal splitting hazard, big leakage in retwadi | चासकमानचा डावा कालवा फुटण्याचा धोका, रेटवडीत मोठी गळती

चासकमानचा डावा कालवा फुटण्याचा धोका, रेटवडीत मोठी गळती

Next

दावडी - रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. स्थानिक रहिवासी जीव मुठीत धरून राहत असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाचे आम्हाला दुसरीकडे राहण्यासाठी जागा
द्यावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.
चासकमान धरणाचे पाणी खेड, शिरूर तालुक्यातील शेतीला उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने धरणापासून १४४ किलोमीटर लांबीचा कालवा तयार केला. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे काम होऊन अनेक वर्षे झाली आहेत. हा कालवा मुरुम व मातीचा वापर करून बनविण्यात आला आहे. त्यासाठी काही ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण, पाण्यासाठी सिमेंटचे बांधकाम केलेले भुयारी मार्ग व पूल तयार केले आहेत. मात्र, या कालव्याच्या कामाला २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. त्यामुळे कालव्याचा भराव कमकुवत झाला आहे. रेटवडी येथील पिराचीवस्ती येथे १० कुटुंबे डाव्या कालव्यालगत पिढीजात राहत आहे. कालव्यासाठी त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. उन्हाळा व पावसाळ््यात डाव्या कालव्यात सोडण्यात येते. यामुळे कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लगतच्या घरामध्ये जात असल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्याप्रमाणे आता पावसाळ्यातही या कालव्याचे पाणी लगतच्या घरामध्ये झिरपत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. भिंतींमध्ये पाणी झिरपत आहे, घराच्या आजूबाजूने पाणी वाहत आहे. काही ठिकाणी पाण्याची डबकी तयार होऊन रहिवाशांच्या घरांमध्ये पाण्याचे उमाळे फुटले आहेत.ओलसरपणा असल्यामुळे नीट झोपता येत नाही. सतत पाणी मुरत असल्याने भिंतीही कमकुवत झाल्या आहेत.

सध्या पावसाळा असल्याने धरणाचा डावा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. घरापुढील रस्त्यावरून पाण्याचा लोट वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावत आहेत.

डाव्या कालव्याच्या जमिनीलगत मोठे भगदाड पडले आहे. त्यामधून रोज लाखो लिटर पाणी बाहेर पडत आहे. कालव्याचा भराव कमकुवत झाल्यामुळे कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. कालवा फुटण्याची एखादी मोठी घटना घडल्यास बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे आदींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात कालवा फुटण्याचा धोका संभवतो.
पाणीगळती व दुरुस्तीसंदर्भात स्थानिक रहिवासी व पदाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. कालवा दुरुस्तीच्या कामासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, भविष्यात कालवा फुटल्याची घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान व खर्चाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Chasammaan's left canal splitting hazard, big leakage in retwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.