सुधा मेनन लिखित ‘गिफ्टेड’ पुस्तकाला कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 08:46 PM2018-03-05T20:46:58+5:302018-03-05T20:46:58+5:30

पुणे : पुण्यातील प्रसिध्द लेखिका सुधा मेननलिखित ‘गिफ्टेड’ या पुस्तकाच्या कन्नड आवृत्तीस मानाचा समजला जाणारा कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.'इंडिया इन्क्लूजन समिट'चे संस्थापक व्ही. आर. फिरोज यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे, तर लेखक आर. मणिकांत आणि नतेश बाबू यांनी पुस्तकाचा कन्नड अनुवाद केला आहे.  

The book 'Gifted' written by Sudha Menon declare the Karnataka Sahitya Akadami Award | सुधा मेनन लिखित ‘गिफ्टेड’ पुस्तकाला कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार 

सुधा मेनन लिखित ‘गिफ्टेड’ पुस्तकाला कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार 

Next
ठळक मुद्देअपंगत्व असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर खंबीरपणे उभे राहून कठीण आव्हाने पेलणा-या व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा या पुस्तकात आहे. २०१३ मध्ये ‘गिफ्टेड’ हे पुस्तक लिहायला घेतले तेव्हा अपंग व्यक्तींबद्दलच्या पुस्तकास बाजारपेठ मिळेल का, अशा शंका काही जणांनी उपस्थित केल्या होत्या

पुणे : पुण्यातील प्रसिध्द लेखिका सुधा मेननलिखित ‘गिफ्टेड’ या पुस्तकाच्या कन्नड आवृत्तीस मानाचा समजला जाणारा कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.'इंडिया इन्क्लूजन समिट'चे संस्थापक व्ही. आर. फिरोज यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे, तर लेखक आर. मणिकांत आणि नतेश बाबू यांनी पुस्तकाचा कन्नड अनुवाद केला आहे.  
या पुरस्काराबद्दल बोलताना सुधा मेनन म्हणाल्या, अपंगत्व असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर खंबीरपणे उभे राहून कठीण आव्हाने पेलणा-या व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा या पुस्तकात आहेत. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या अनुभवांचे कथन वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल.''
आ  म्ही जेव्हा २०१३ मध्ये ‘गिफ्टेड’ हे पुस्तक लिहायला घेतले तेव्हा अपंग व्यक्तींबद्दलच्या पुस्तकास बाजारपेठ मिळेल का, अशा शंका काही जणांनी उपस्थित केल्या होत्या. मात्र केवळ काही महिन्यांतच हे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम विक्रीच्या पुस्तकांपैकी एक बनले. आता ते बंगाली, मल्याळम आणि कन्नडमध्ये अनुवादित करण्यात आले आहे. याबरोबरच सध्या मराठी व तमिळ भाषेतही त्याचा अनुवाद केला जात आहे, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असल्याची भावना मेनन यांनी व्यक्त केली. 
‘गिफ्टेड'साठी अपंग व्यक्तींच्या कथा जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या जगण्याविषयी मला कोणतेही ज्ञान नव्हते. मात्र मुलाखती घेतल्यानंतर त्यांची सकारात्मकता आणि आपल्या ध्येयाबद्दलची बांधिलकी पाहायला मिळाली. त्यांच्यात असलेल्या क्षमता पाहून आम्ही थक्क झालो, असेही मेनन यांनी सांगितले.

Web Title: The book 'Gifted' written by Sudha Menon declare the Karnataka Sahitya Akadami Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.