भणक लागताच बोगस डॉक्टर पसार, पूर्व हवेलीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:53 AM2018-03-08T02:53:38+5:302018-03-08T02:53:38+5:30

पुर्व हवेलीत बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून कसलीही वैद्यकीय पदवी नसलेले हे परप्रांतीय भोंदू उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करत आहेत. आज अशाच एका डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी शासकीय पथक गेले होते. परंतू पथक पोहचण्यापुर्वीच डॉक्टराला सुगावा लागल्याने तो फरार झाला.

 A bogus doctor can be found at the hospital, a bogus doctor in the east haveli? | भणक लागताच बोगस डॉक्टर पसार, पूर्व हवेलीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट?

भणक लागताच बोगस डॉक्टर पसार, पूर्व हवेलीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट?

Next

लोणी काळभोर  - पुर्व हवेलीत बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून कसलीही वैद्यकीय पदवी नसलेले हे परप्रांतीय भोंदू उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करत आहेत. आज अशाच एका डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी शासकीय पथक गेले होते. परंतू पथक पोहचण्यापुर्वीच डॉक्टराला सुगावा लागल्याने तो फरार झाला.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातील इंदिरा नगर कडे जाणा-या एका इमारतीत गेली १० ते १५ वर्षे पासून सदर इसम दवाखाना थाटून मुळव्याध, भगंदर, फिशर आदी रोगांवर आयुवेर्दीक पद्धतीने उपचार व शस्त्रक्रिया करत होता. सदर रोग सांगण्यासारखे नसल्याने उपचारानंतर त्रास झाला तरी याची चर्चा होत नव्हती. त्यांमुळे या डॉक्टरांचा फावले होते. सदर बाब काहींना समजली त्यांमुळे स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जाधव यांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आज सकाळी कदमवाकवस्ती वैद्यकीय अधिकारी जाधव यांनी कारवाई कारवाई करण्यासाठी एक पथक तयार केले यामध्ये साहय्यक वैद्यकीय अधिकारी घाटे, पोलीस व स्थानिकही होते. दवाखाना तपासणी करण्यासाठी पथक येत आहे. याचा सुगावा लागताच तो दवाखाना बंद करून फरार झाला. वैद्यकीय अधिका-यांनी या बोगस डॉक्टरच्या पदवी प्रमाण पात्राच्या सत्यप्रतीची मागणी त्याच्या कुटुंबियांकडे केली असून तपासणी नंतर जर पदवी बोगस असेल तर या डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.

लैैंगिक समस्यांच्या जाहिराती करुन बोगस डॉक्टर रुग्णांची अडवणूक करुन त्यांच्याकडून पैैसे उकळत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची मान्यता नसलेली औषधे देऊन फसवणूक केली जात असल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title:  A bogus doctor can be found at the hospital, a bogus doctor in the east haveli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.