भोर तहसील कार्यालय : नीरा देवघर बाधितांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:36 AM2018-04-04T02:36:51+5:302018-04-04T02:36:51+5:30

नीरा देवघर धरण पूर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवून १५ वर्षे झाली तरीही अद्याप नीरा देवघर प्रकल्पातील बाधित ६० टक्के शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने मंगळवारपासून भोर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून

 Bhor tehsil office: Movement of Neera Devghar bandhita | भोर तहसील कार्यालय : नीरा देवघर बाधितांचे आंदोलन

भोर तहसील कार्यालय : नीरा देवघर बाधितांचे आंदोलन

Next

भोर - नीरा देवघर धरण पूर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवून १५ वर्षे झाली तरीही अद्याप नीरा देवघर प्रकल्पातील बाधित ६० टक्के शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने मंगळवारपासून भोर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, जिल्हा पुनर्वसन अधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
महाराष्ट्र कृणा खोरे विकास संस्थेच्या वतीने नीरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यापूर्वी धरणग्रस्तांच्या वतीने भोर एसटी स्टँडवरील छत्रपती शिवाजीमहाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बसस्थानकापासून आंदोलकांनी चालत जाऊन तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात लक्ष्मण पासलकर, दिलीप देशपांडे, कॉम्रेड ज्ञानोबा घोणे, हनुमंत शिरवले, प्रकाश साळेकर, ज्ञानोबा दिघे, संजय साने, राजू दिघे, बबन पोळ, भाऊ पोळ, अंकुश कंक, मारुती कंक, बाळासाहेब पावगे, धोंडिबा मालुसरे, लक्ष्मण दिघे, कोंडिबा उंब्राटकर, बाळासाहेब
कंक, नंदकुमार देशपांडे, ज्ञानोबा धामुणसे व धरणग्रस्त सहभागी
झाले आहेत.
नीरादेवघर धरणात सुमारे ४ हजार एकर जमीन पाण्यात गेली आहे.धरणात गेलेल्या शेतकºयांची संकलन यादी १४५० खातेदारांची असून आतापर्यंत मागील १५ वर्षांत फक्त ६०० खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले असून ८५० खातेदारांचे (६० टक्के) पुनर्वसन अद्याप बाकी आहे.धरणग्रस्तांच्या मागण्या अशा:अंशत: व पूर्णत: बाधित गावांचे १०० टक्के पुनर्वसन
करा. नीरादेवघर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमिनी १०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत इतरांना वाटप करूनये. १६मे २००७ महसूल व पुनर्वसनमंत्री व रामराजे नाईक निंबाळक र यांच्या उपस्थितीत बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करा. प्रकल्पग्रस्तांना शासन
नोकºया देऊ शकत नसल्याने १० लाख रुपयांचे अनुदान द्यावे.
प्रकल्पग्रस्त खातेदारांना वहिवाट अडथळे दूर करावेतव वाटप केलेल्या जमिनीचे ताबे कब्जापट्टी करण्यात यावे,लाभक्षेत्रातील जमिनीला पाटाची व्यवस्था करावी,पुनर्वसित गावठाणातील १८ नागरी सुविधा तातडीने पूर्ण कराव्या,फलटण खंडाळा तालुक्यातील एमआयडीसीत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने नोकºया द्याव्यात, या मागण्यांसाठी धरणग्रस्तांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

कार्यकारी अभियंता दिगंबर डुबलांनी घेतली भेट
नीरादेवघर धरणाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी धरणग्रस्तांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याबाबत चर्चा केली.मात्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी पुणे व सातारा हे धरणग्रस्तांची बैठक लावून त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करून त्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन देत नाहीत,तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र कृष्णाखोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे व सचिव प्रकाश साळेकर यांनी सांगितले. नीरादेवघर धरणग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे.

Web Title:  Bhor tehsil office: Movement of Neera Devghar bandhita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.