दैवी शक्तीच्या बहाण्याने कुटुंबाचे लैगिक शोषण, साताºयातील भोंदूबाबा शेखला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:45 AM2017-12-06T03:45:04+5:302017-12-06T03:45:14+5:30

दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार करीत या

Bhondu Baba Shaikh arrested for sexual exploitation of the family | दैवी शक्तीच्या बहाण्याने कुटुंबाचे लैगिक शोषण, साताºयातील भोंदूबाबा शेखला अटक

दैवी शक्तीच्या बहाण्याने कुटुंबाचे लैगिक शोषण, साताºयातील भोंदूबाबा शेखला अटक

Next

पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार करीत या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक, शारीरिक शोषण करणा-या साता-याच्या भोंदुबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे़.  २००४ सालापासून हा प्रकार सुरु होता़
हैदरअली रशीद शेख (वय ४७, रा़ कसबा हाईटस, गुरुवार पेठ, सातारा) असे भोंदुबाबाचे नाव आहे़ याप्रकरणी कोंढवा येथील महिलेने फिर्याद दिली आहे़ ती मूळची सातारची आहे़ १९९९ रोजी तिचा विवाह झाला़ पतीचा पुण्यात व्यवसाय असल्याने ते पुण्यात स्थायिक झाले़ तिला २००३ मध्ये रक्ताच्या उलट्या होणे, चक्कर येणे असा त्रास व्हायचा़ नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार करूनही काही परिणाम होत नव्हता़ तिच्या सासूला हैदरअली शेखकडे दैवी शक्ती असल्याचे समजल्याने ते त्याच्या संपर्कात आले़ महिलेचा पतीही शेखच्या नादी लागला़ गाडी, जमीन आदी तो शेखच्या सल्ल्यानेच घेत असे़ या महिलेला आजार दूर करतो, त्यासाठी बाहेर जावे लागेल, असे सांगून शेख वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत असे़ त्यांच्याकडून मोठी रक्कमही उकळत असे़ त्याने या महिलेसह तिच्या सासुलाही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केले़ त्याचे त्याने व्हिडिओ शुटिंगही केले़ त्याने या कुटुंबाकडून ८ लाख रुपये, सातारा येथील फ्लॅट, तीन महागड्या मोटारी, मोटारसायकल, पुणे येथील आॅफिस स्वत:कडे घेतले़ ही महिला आणि सासुपाठोपाठ त्याची नजर त्यांच्या १४ वर्षाच्या मुलीवर पडली़ तिच्याशीही त्याने शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला़ यानंतर कुटुंबाचे डोळे उघडले़ त्यानंतर त्यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली़

हैदरअली शेख हा केवळ चौथी पास आहे़ तर फिर्यादीचा पती सिव्हिल इंजिनिअर आहे़ शेखने या इंजिनिअरला पूर्णपणे आपल्या कब्जात घेतले होते़ त्याने आपल्याला हिप्नोटाईज केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले़

Web Title: Bhondu Baba Shaikh arrested for sexual exploitation of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा