बारामतीच्या मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवकांची ‘दादागिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:19 AM2018-06-14T02:19:54+5:302018-06-14T02:19:54+5:30

बारामती शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईवरून मुख्याधिकाºयांना त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, बांधकाम विभागाच्या सभापतींनी अरेरावी केल्याचा प्रकार बुधवारी (दि १३) दुपारी घडला.

Baramati news | बारामतीच्या मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवकांची ‘दादागिरी’

बारामतीच्या मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवकांची ‘दादागिरी’

googlenewsNext

बारामती - शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईवरून मुख्याधिकाºयांना त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, बांधकाम विभागाच्या सभापतींनी अरेरावी केल्याचा प्रकार बुधवारी (दि १३) दुपारी घडला. या घटनेच्या निषेधार्थ नगर परिषदेच्या सर्व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन केले. नगरसेवकांनी केलेली अरेरावी, कर्मचाºयांनी केलेले काम बंद आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले होते.
पतंगशाहनगर रिंगरोडलगत सुरू असलेले अतिक्रमण काढताना सोमवारी (दि. ११) स्थानिक नगरसेवकांनी मुख्याधिकाºयांशी चर्चा करतो, दोन दिवसांची मुदत द्या, असे सांगितले. त्यावर अतिक्रमणविरोधी पथकाने नगरसेवकांचा मान राखून काम थांबविले.
मात्र, हे अतिक्रमण काढण्यावरून काही नगरसेवकांसमवेत नगरसेवक आणि नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती समीर चव्हाण मुख्याधिकाºयांच्या दालनात गेले. यावेळी अतिक्रमणावरून मुख्याधिकाºयांनी त्यांनी अरेरावी केल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर नगरपरिषद कर्मचाºयांनी निषेध व्यक्त करत कामबंद आंदोलन सुरू केले.
याबाबत बारामती कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष मोहन शिंदे यांनी सांगितले,की सफाई कामगार, इतरांना शिवीगाळ करण्याचे प्रकार घडतात. आज मुख्याधिकाºयांवर ही वेळ आली आहे. उद्या आमच्यावरदेखील वेळ येऊ शकते. या घटनेचा आम्ही निषेध करतो.
कास्ट्राईब संघटनेचे नेते राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले, की म्नगरसेवकांनी नि:स्वार्थी भावनेतून कामे करून द्यावीत. आज पूर्ण दिवस मुख्याधिकाºयांना अरेरावीची भाषा वापरल्याच्या निषेधार्थ कामबंद करण्यात आले आहे. दुपारी २.३० पासून हे काम बंद करण्यात आले.

अधिकाºयांशी अडेलतट्टूपणाने वागाल, ते मी खपवून घेणार नाही. अलीकडे घरगडी कोणाचे ऐकत नाही. मग तुम्ही त्यांच्याशी घरगड्याप्रमाणे वागला तर कसे चालेल, अशा शब्दांत फेब्रुवारीमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांत महिन्यात चितळे यांनी स्वत:ची बदली करून घेतली. चितळे केवळ ११ महिने कार्यरत होते. या पार्श्वभूमीवर चितळे यांच्यानंतर रुजू झालेल्या मुख्याधिकाºयांना राष्ट्रवादीच्याच नगरसेवकाकडून कडूसकर यांना अरेरावी झाल्याने या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली होती.

नगरसेवक समीर चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, मुख्याधिकाºयांना हे अतिक्रमण नसताना कारवाई का केली, याची विचारणा केली. बांधकाम समिती सभापती या नात्याने तसेच नगरसेवक या नात्याने आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. याची जाणीव ठेवून केवळ विचारणा केली. त्यांच्याशी कोणतीही अरेरावी केली नाही. शहरातील सर्वसामान्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, बड्यांवरील कारवाईकडे दुर्लक्ष सुरू आहे. याबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

Web Title: Baramati news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.