सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभियंत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 18:32 IST2018-11-01T18:12:12+5:302018-11-01T18:32:25+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इस्टेट विभागाच्या प्रमुख कार्यकारी अभियंत्याला जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार विद्यापीठात घडला अाहे.

attempt to murder of pune university chief engineer | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभियंत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभियंत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : कामाच्या वादातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इस्टेट विभागाच्या प्रमुख कार्यकारी अभियंत्यावर दाेघांनी अाॅईल अाेतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना अाज सकाळी 11 वाजता घडली असून दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात येत अाहे. 

    इस्टेट विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता अार. व्ही . पाटील यांच्यावर हा हल्ला करण्यात अाला. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात अाले अाहे.बांधकाम सहाय्यक अभिजित साठे व स्वीपर नितीन प्रसाद या दोघांनी पाटील यांच्यावर कामाच्या वादातून आॅईल ओतले असल्याचे समाेर अाले अाहे. तसेच पाटील यांना मारण्यासाठी या दाेघांनी माेठा दगड अाणि काडीपेटी सुद्धा अाणली हाेती अशी माहिती समाेर येत अाहे. दरम्यान संध्याकाळपर्यंत या संदर्भात विद्यापीठाकडून कुठलेही स्पष्टीकरण अाले नव्हते. विद्यापीठाच्या प्रमुख अभियंत्यावर हल्ला झाल्याने विद्यापीठात अाश्चर्य व्यक्त करण्यात येत अाहे. 

Web Title: attempt to murder of pune university chief engineer