जेवणाच्या डब्यातून गांजा पुरविणाऱ्या शिपायाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:23 AM2019-05-22T05:23:22+5:302019-05-22T05:23:24+5:30

अमली पदार्थ आत नेताना पकडलेला पहिलाच कर्मचारी

The arrest of the man who provided Ganja from the dining box | जेवणाच्या डब्यातून गांजा पुरविणाऱ्या शिपायाला अटक

जेवणाच्या डब्यातून गांजा पुरविणाऱ्या शिपायाला अटक

Next

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात जेवणाच्या डब्यातून गांजा पुरवणाºया एका कारागृह शिपायाला कारागृहातील पोलिसांनी सापळा रचून पकडले़ विकी सुदाम वसावे (३१) असे अटक शिपायाचे नाव आहे. कारागृह कर्मचारीच अमली पदार्थ आत नेत असताना सापडल्याची ही पहिलीच घटना आहे़


याप्रकरणी, नागनाथ संभू जताप (वय ३७, रा. जेल अधिकारी वसाहत) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी सांगितले की, कारागृहात येणाºया प्रत्येक कर्मचाºयाची गेटवर तपासणी करण्यात येते़ वसावे हादेखील नेहमीप्रमाणे गेटवरून जात होता़ त्या वेळी गांजाचा वास आल्यामुळे गेटवर असलेल्या रक्षकांनी त्याचा जेवणाचा डबा तपासला़ त्यातील पिशवीमध्ये गांजा आढळला. त्यानुसार त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ कारागृहात असलेल्या सराईत गुन्हेगार व इतर कैद्यांना चोरून अमली पदार्थ तसेच मोबाईल व अन्य वस्तू नियमितपणे पुरविल्या जातात़

Web Title: The arrest of the man who provided Ganja from the dining box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.