कृषी अधिकाऱ्यासह पाच जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 04:17 PM2018-05-26T16:17:24+5:302018-05-26T16:17:24+5:30

बारामतीमधील मौजे जळगाव येथील खासदार निधीतून मंजूर सिमेंट नाला बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करताना आरोपींनी पदाचा दुरुपयोग केला.

Anti corruption department has taken action against five person including Agriculture Officer | कृषी अधिकाऱ्यासह पाच जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कृषी अधिकाऱ्यासह पाच जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देनिविदा भरलेली नसताना त्यांना काम सुरु करण्याचा आदेश

पुणे : पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह पाच जणांवर कारवाई केली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बारामतीचे तत्कालिन उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद पर्वतराव परजणे (वय ६०), तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार नारायण बरकडे (वय ५०), मंडल कृषी अधिकारी पोपट शंकर ठोंबरे (वय ५७), कृषी पर्यवेक्षक शाहुराज हरिचंद्र मोरे (वय ४३), कृषी सहायक विजय किसन चांदगुडे (वय ५५) यांच्या विरोधात बारामती येथे ही कारवाई करण्यात आली. 
बारामतीमधील मौजे जळगाव येथील ग्रामस्थांसाठी २०१५-१६मध्ये खासदार निधीतून मंजूर सिमेंट नाला बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करताना आरोपींनी पदाचा दुरुपयोग केला. ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही म्हणून सिध्दांत कन्स्ट्रक्शन यांनी निविदा भरलेली नसताना त्यांना काम सुरु करण्याचा आदेश काढला. हा आदेश काढण्याचा आरोपींना कोणताही अधिकार नव्हता. तसेच सिद्धांत कन्स्ट्रक्शनकडून कोणतीही अनामत रक्कम व अतिरिक्त सुरक्षा ठेव भरुन घेतली नाही. आरोपींनी शासकीय रकमेचा वापर सिद्धांत कंन्स्ट्रक्शन यांना आर्थिक फायदा होण्याकरीता पदाचा दुरुपयोग केला. सिध्दांत कन्स्ट्रक्शनचे शिवाजी भोंडवे यांनी निविदा भरलेली नसताना देखील बेकायदा मार्गाचा अवलंब करुन कामे मिळवली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Anti corruption department has taken action against five person including Agriculture Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.