पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:46 AM2017-12-28T11:46:23+5:302017-12-28T11:53:14+5:30

पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी  रेल्वे बोर्डाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. २ ते ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे.

All platforms of Pune railway station will be increased; 26 coach trains will also be able to stop | पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार

पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार

googlenewsNext
ठळक मुद्देमार्च २०१९ पर्यंत पूर्ण काम पूर्ण करण्याचे ठेवण्यात आले उद्दिष्ट येत्या ३ ते ४ महिन्यांत सुरू केले जाणार घोरपडी येथे रेल्वेचे लॉन्ड्री सेंटर

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी  रेल्वे बोर्डाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. २ ते ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानकावरील सर्वच फलाटांवर २६ कोचच्या गाड्या थांबू शकतील. मार्च २०१९ पर्यंत पूर्ण हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्या पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. २ ते ६ ची लांबी कमी असल्याने तेथे २६ डब्यांची गाडी थांबविली जात नाही. केवळ एक आणि सात क्रमांकाच्या फलाटांवरच २६ डब्यांच्या गाड्या थांबतात, असे नमूद करून देऊस्कर म्हणाले, ‘‘रेल्वे स्थानकाची लांबी कमी असल्याने या फलाटांवर मालगाडी थांबविता येत नाही. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांना थांबवून मालगाडीला प्रथम सोडावे लागते. 
परिणामी,  इतर गाड्यांना १० मिनिटे उशीर होतो. परंतु, लवकरच २ ते ६ फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे.
देऊस्कर म्हणाले, ‘‘सर्व फलाटांवर २६ डब्यांच्या गाड्या उभ्या करता याव्यात, या दृष्टीने शिवाजीनगरच्या दिशेला या फलाटांची लांबी वाढविली जाणार आहे. घोरपडी येथे रेल्वेचे लॉँड्री सेंटर येत्या ३ ते ४ महिन्यांत सुरू केले जाणार आहे. येथे रेल्वेचे बेड रोल व इतर कापडी साहित्य धुण्याचे काम केले जाईल. त्यामुळे अस्वच्छतेच्या कारणास्तव प्रवाशांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण घटेल.’’

रेल्वेखाली गेले १३२ जणांचे प्राण 
पुणे-लोणावळा मार्गावर धावत्या लोकलखाली या वर्षात एप्रिलपासून आतापर्यंत १३२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यात अनधिकृतपणे रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या प्रवाशांचा सर्वाधिक समावेश आहे. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असून, काही जनावरेही मरण पावली आहेत, असेही देऊस्कर यांनी सांगितले.


पुणे-लोणावळा मार्गावर आॅटोमॅटिक सिग्नल
पुणे-लोणावळा मार्गावर आॅटोमॅटिक सिग्नल ब्लॉकिंगचे काम सुरू असून, अत्तापर्यंत पुणे ते कामशेतदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. कामशेत ते लोणावळ्यादरम्यानचे कामही लवकरच पूर्ण होईल. आॅटोमॅटिक सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर सुरळीत वाहतुकीला हातभार लागेल. या यंत्रणेमुळे भविष्यात पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्यांत वाढ होऊ शकते, असेही देऊस्कर म्हणाले.

Web Title: All platforms of Pune railway station will be increased; 26 coach trains will also be able to stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.