पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 13:55 IST2018-10-22T13:51:43+5:302018-10-22T13:55:47+5:30
पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन चोरीच्या घटनेतील (दि. २२ ) दोन आरोपी आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून
खेड : खेडपोलिस कठडीच्या इमारतीतील खिडकीचे गज कापून आरोपी पळाले. पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन चोरीच्या घटनेतील (दि. २२ ) दोन आरोपी आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे.
साथीदारांच्या मदतीने पलायन केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. झोपलेल्या पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरु असून विशाल दत्तात्रय तांदळे वय २२, रा मंचर, ता आंबेगाव जि. पुणे व राहुल देवराम गोयेकर, वय २६, रा. गोयेकरवाडी ता. कर्जत, जि. अहमदनगर अशी दोन आरोपींची नावे आहेत.