मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे अपघात; 1 ठार 1 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 08:41 AM2018-02-11T08:41:13+5:302018-02-11T08:41:27+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे दोन मालवाहू टेम्पो य‍ांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Accident at Somatek Phata on Mumbai-Pune Expressway; 1 killed one killed | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे अपघात; 1 ठार 1 जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे अपघात; 1 ठार 1 जखमी

Next

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे दोन मालवाहू टेम्पो य‍ांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मालवाहू वाहने ही पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. सोमाटणे गावाच्या हद्दीत मागील वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो समोरच्या वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी मृताला गाडीबाहेर काढत जखमीला उपचाराकरिता तळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे काही काळ द्रुतगतीवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. महामार्ग पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजूला केल्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.

Web Title: Accident at Somatek Phata on Mumbai-Pune Expressway; 1 killed one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.