सिंहगड रस्त्यावर मायलेकी घरात असताना नग्न अवस्थेत तरुण शिरला घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:23 PM2022-09-12T12:23:10+5:302022-09-12T12:24:11+5:30

एक तरुण संपूर्ण नग्नावस्थेत घरात शिरला...

A young man entered the house naked while Mileki was in the house on Sinhagad road | सिंहगड रस्त्यावर मायलेकी घरात असताना नग्न अवस्थेत तरुण शिरला घरात

सिंहगड रस्त्यावर मायलेकी घरात असताना नग्न अवस्थेत तरुण शिरला घरात

Next

-किरण शिंदे

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास मायलेकी दोघीच घरात असताना एक तरुण संपूर्ण नग्नावस्थेत घरात शिरला. त्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग केला.

सिंहगड रस्त्यावरील पानमळा वसाहत येथे शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. एका 35 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली असून आरोपी विनय दत्तात्रय वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम सुरू असताना हा प्रकार घडला. पीडित महिला ही 15 वर्षीय अल्पवयीन मुली सोबत घरात असताना आरोपी पूर्ण नग्न अवस्थेत घरात शिरला.

फिर्यादीच्या मुलीचा हात पकडून तिच्याशी अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. तर फिर्यादीच्या बहिणीच्या हातावर जड वस्तूने प्रहार करत जखमी केले आहे.. दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: A young man entered the house naked while Mileki was in the house on Sinhagad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.