नारायणगाव येथे देहविक्रय करणाऱ्या ९ महिलांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:08 PM2018-04-04T14:08:10+5:302018-04-04T14:08:10+5:30

आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसाय करणे कामी काही मुलींना व महिलांना आणण्यात आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

9 women arrested in Narayangaon | नारायणगाव येथे देहविक्रय करणाऱ्या ९ महिलांना अटक 

नारायणगाव येथे देहविक्रय करणाऱ्या ९ महिलांना अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी लॉज मालकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल.मुंबई व कोलकत्ता येथील एकूण ९ पीडित मुली

नारायणगाव : मौजे कांदळी व आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसायासाठी मुली व महिला आणण्यात असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कांदळी येथील हॉटेल योगीराज लॉजवर केलेल्या कारवाई अंतर्गत मुंबई,पुणे व कोलकत्ता येथील एकूण ९ पीडित मुली आढळून आल्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.तसेच या सबंधित लॉज मालक,व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
याप्रकरणी लॉज चालक कृष्णा सुरेश फरपट (वय ३० रा.नारायणगाव, मुळ रा. खामखेड जि.बुलढाणा),लॉज व्यवस्थापक अजय रुपलाल राजने (रा.कांदळी,रा.पतराडे अमरावती)आणि लॉज मालक शेषमल हारकू लांडगे (रा. वडगाव कांदळी ता.जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भिमा यशवंत लोंढे पोलीस हवालदार यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे . 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसाय करणे कामी काही मुलींना व महिलांना आणण्यात आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके व सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या पथक आळेफाटा व परिसरातील सर्व लॉजची तपासणी करत असताना खात्रीशीर मिळालेल्या कांदळी गावचे हद्दीतील हॉटेल मध्ये ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी या मुली व महिला आणण्यात आली असल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित लॉजमध्ये केलेल्या कारवाई करताना मुंबई व कोलकत्ता येथील एकूण ९ पीडित मुली आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी लॉज चालक व व्यवस्थापक यांना अटक करून स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची( दि ७ पर्यंत) पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. 

Web Title: 9 women arrested in Narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.