गटारी अमावास्येला ४८८ तळीरामांवर कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 08:25 PM2018-08-13T20:25:18+5:302018-08-13T20:25:44+5:30

गटारी अमावास्येच्या रात्री पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाईत ४८८ तळीराम पकडले गेले आहेत.

488 cases filed against drunk and drive | गटारी अमावास्येला ४८८ तळीरामांवर कारवाई !

गटारी अमावास्येला ४८८ तळीरामांवर कारवाई !

 

पुणे : गटारी अमावास्येच्या रात्री पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाईत ४८८ तळीराम पकडले गेले आहेत.या सर्वांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली. 

श्रावण महिना सुरु होण्याच्या आधी दोन दिवस (दि११ व १२ऑगस्ट) रोजी संपूर्ण पुणे शहरात ड्रंक आणि ड्राइव्ह संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली.यामध्ये एकूण ४८८ चालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार कारवाई  करण्यात आली. यात सापडलेल्या ४८८८ व्यक्तींच्या विरुद्ध मोटार वाहन कोर्ट, पुणे यांच्या न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. 

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम यापुढेही चालू राहणार असल्याचे वाहतूक शाखेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: 488 cases filed against drunk and drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.