‘सीईटी’साठी ११वीचा २० टक्के अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 06:42 AM2017-10-07T06:42:23+5:302017-10-07T06:42:39+5:30

राज्यात अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाºया सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) इयत्ता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम असणार आहे.

20 percent course of 11th for CET | ‘सीईटी’साठी ११वीचा २० टक्के अभ्यासक्रम

‘सीईटी’साठी ११वीचा २० टक्के अभ्यासक्रम

Next

पुणे : राज्यात अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाºया सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) इयत्ता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. मे २०१८ मध्ये होणाºया सीईटीपासून हा बदल लागू केला जाणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) सीईटीचा अभ्यासक्रम, पॅटर्न याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षापर्यंत ही परीक्षा केवळ राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जात होती. देशपातळीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ‘जेईई’ व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ या परीक्षा ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमानुसार घेतल्या जातात. त्यामध्ये राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम तुलनेने मागे असल्याचे विद्यार्थी-पालक तसेच तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याबरोबरच सीईटीचा अभ्यासक्रम, काठिण्य पातळी, पॅटर्नमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मे २०१८मध्ये होणारी सीईटी या बदलांप्रमाणे घेतली जाणार आहे. या परीक्षेमध्ये आता राज्य मंडळाचा अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. बारावीच्या अभ्यासक्रमाला ८० टक्के महत्त्व दिले जाईल. निगेटिव्ह मार्किंग पद्धत परीक्षेसाठी नसेल. ‘सीईटी’साठी गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची काठिण्यपातळी ‘जेईई (मेन्स)’प्रमाणे तर जीवशास्त्र विषयाची काठीण्यपातळी नीटप्रमाणे असेल. परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुणांच्या
तीन प्रश्नपत्रिका असतील. ‘सीईटी’साठी चारही विषयांचा इयत्ता अकरावीचा अभ्यासक्रमही डीटीईने प्रसिद्ध केला आहे.

Web Title: 20 percent course of 11th for CET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.